शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्कायवॉकवर शिक्षिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:56 IST

शाळेतून घरी जाण्यासाठी स्कायवॉकवरून निघालेल्या ५८ वर्षीय शिक्षिकेला एका विकृताने धक्का देत खाली पाडले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करत, जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वांद्रे येथे घडली.

मुंबई : शाळेतून घरी जाण्यासाठी स्कायवॉकवरून निघालेल्या ५८ वर्षीय शिक्षिकेला एका विकृताने धक्का देत खाली पाडले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे करत, जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वांद्रे येथे घडली. घाबरलेल्या शिक्षिकेने कसेबसे त्याच्या तावडीतून सुटका करत पळ काढला. तो विकृतही त्यांच्यामागे धावू लागला. अखेर पायऱ्यांखाली असलेल्या गर्दीकडे त्यांनी मदत मागितली. जमावाने पळण्याच्या तयारीत असलेल्या वाजीद नागोरी (३७) या विकृताला ताब्यात घेत चोप दिला. वांद्रे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरवणीवर आला आहे.वसईच्या रहिवासी असलेल्या या शिक्षिका वांद्रे येथील एका नामांकित शाळेत शिकवतात. शुक्रवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास त्या शाळेतून घरी जाण्यासाठी स्कायवॉकवरून निघाल्या. एकट्या असलेल्या शिक्षिकेवर वाजीदची नजर पडली. आजूबाजूला कोणी नाही, याची संधी साधून वाजीदने हाताने त्यांच्या छातीवर धक्का दिला. त्यामुळे तोल जाऊन त्या खाली कोसळल्या. त्या उठण्याचा प्रयत्न करणार, तोच वाजीदने त्यांच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.वाजीदला प्रतिकार करत, शिक्षिकेने त्याच्या तावडीतून सुटका करत ‘बचाव बचाव’ म्हणत त्यांनी पळ काढला. वाजीदही त्यांच्यामागे पळत होता. अखेर पाय-यांखाली उभ्या असलेल्या पादचारी आणि वाहनचालकांना त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. गर्दी जमत असल्याचे पाहून वाजीद मागे फिरला. जमावाने पाठलाग करत त्याला चोप देत वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले.शिक्षिकेच्या तक्रारीवरून आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे गिरीश अवणकर यांनी दिली. प्राथमिक तपासात तो अभिलेखावरील आरोपी नसल्याचेही अनवकर यांनी सांगितले. वाजीद हा बेरोजगार असून, वांद्रे (प) शास्त्रीनगर परिसरात राहतो. या घटनेमुळे तक्रारदार शिक्षिका या मानसिक तणावाखाली आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा