शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गँगवारची झळ पोलीस ठाण्याला : तहसीलचे ठाणेदार मालवीय यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:36 IST

शनिवारी मध्यरात्री बंगाली पंजा भागात झालेल्या गँगवॉरने तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्माण केलेला तणाव जैसे थेच आहे. गुंडांच्या दोन गटातील वैमनस्य यामुळे अधिक तीव्र झाले आहे.

ठळक मुद्देभांडारकर सांभाळणार तहसील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी मध्यरात्री बंगाली पंजा भागात झालेल्या गँगवॉरने तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्माण केलेला तणाव जैसे थेच आहे. गुंडांच्या दोन गटातील वैमनस्य यामुळे अधिक तीव्र झाले आहे. कुख्यात वसीम चिऱ्या किंवा त्याचे साथीदार हाती लागलेले नाही. या पार्श्वभूमीवर, तहसीलचे ठाणेदार अरुणकुमार मालवीय यांची बदली झाल्याने उलटसुलट चर्चेत भर पडली आहे. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भंडारकर यांना तहसीलचे ठाणेदार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.लकडगंज-शांतिनगरचा कुख्यात गुंड वसीम चिऱ्या तसेच त्याचे साथीदार दानिश आणि त्यांचा प्रतिस्पर्धी आवेश यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादाचा भडका उडाला. आवेश आणि त्याच्या साथीदारांनी शनिवारी रात्री वसीमचा साथीदार मोहसीन अकोला याला बेदम मारहाण केली. त्याने कसाबसा जीव वाचवून तेथून पळ काढला. ही माहिती त्याने वसीम चिऱ्या आणि दानिशला दिली. त्यामुळे हे दोघेही २० ते २५ साथीदारांसह बंगाली पंजा भागात पोहचले. वसीमने ५ फायर (गोळ्या झाडल्या) केले तर, १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. यामुळे त्या भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्याची गंभीर दखल घेतली. आरोपींना तातडीने हुडकून काढा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा, असे कडक आदेश दिले. मात्र, ४८ तास होऊनही सानू वगळता कुणी पोलिसांच्या हाती लागले नाही. या पार्श्वभूमीवर, सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी तहसीलचे ठाणेदार मालवीय यांची वाहतूक शाखेत बदली केली. त्यांच्या रिक्त पदी वाहतूक शाखेचे जयेश भांडारकर यांची नियुक्ती केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसTransferबदली