शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:34 IST

Anurag Dwivedi : ऑनलाईन सट्टेबाजी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने उत्तर प्रदेशचा युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर अनुराग द्विवेदीला मोठा दणका दिला आहे.

ऑनलाईन सट्टेबाजी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने उत्तर प्रदेशचा युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर अनुराग द्विवेदीला मोठा दणका दिला आहे. तपास यंत्रणेने नुकतीच अनुरागच्या उन्नाव, लखनौ आणि नवाबगंजसह एकूण नऊ ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईत अनेक महत्त्वाची कागदपत्रं आणि कोट्यवधींच्या मालमत्तेचे पुरावे हाती लागले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीचा तपास आता केवळ सट्टेबाजीपुरता मर्यादित राहिलेला नाही. दुबईत एका आलिशान क्रूझ शिपवर झालेला अनुराग द्विवेदीचा 'शाही विवाह' आता तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे. या लग्नात अफाट खर्च करण्यात आला असून, त्यात नातेवाईकांव्यतिरिक्त काही प्रसिद्ध सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. आता ईडी या सेलिब्रिटींची यादी, त्यांची उपस्थिती आणि लग्नासाठी झालेल्या खर्चाच्या सोर्सची माहिती गोळा करत आहे.

२०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?

अनुराग द्विवेदीवर अवैध ऑनलाईन बेटिंग एप्सची जाहिरात आणि प्रसार केल्याचा आरोप आहे. या एप्सच्या माध्यमातून मिळालेली कोट्यवधींची कमाई त्याने 'हवाला' मार्फत दुबईतील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये गुंतवल्याचा ईडीचा दावा आहे. छापेमारीत सापडलेली कागदतपत्रं 'मनी ट्रेल'कडे स्पष्ट इशारा करत आहेत.

तपासादरम्यान एजन्सीने चार अत्यंत महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत. यामध्ये लॅम्बोर्गिनी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजसारख्या कारचा समावेश आहे. गाड्यांशिवाय अनेक डिजिटल उपकरणं आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रंही ताब्यात घेण्यात आली आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग द्विवेदी सध्या दुबईत वास्तव्यास असून ईडीने वारंवार समन्स बजावूनही तो चौकशीसाठी हजर झालेला नाही. एजन्सी आता त्याचं नेटवर्क, फंडिंग चेन आणि पार्टनर्सच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी नोंदवलेल्या फसवणूक आणि अवैध सट्टेबाजीच्या एफआयआरच्या आधारे ईडीने 'पीएमएलए' (PMLA) कायद्यांतर्गत हा तपास सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : YouTuber's lavish wedding, luxury cars, and Dubai escape under ED scanner.

Web Summary : ED investigates YouTuber Anurag Dwivedi for online betting, money laundering. Raids uncovered assets, luxury cars. His Dubai wedding is scrutinized, with celebrity guests under investigation. Dwivedi, accused of illegal betting app promotion, allegedly invested proceeds in Dubai real estate. He is currently in Dubai, evading summons.
टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMONEYपैसा