शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ईडीने वर्षभरात नोंदविले ५०५ टक्के अधिक गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 06:07 IST

आठ वर्षांत तब्बल ९५ हजार कोटींची मालमत्ता जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाकाय व क्लिष्ट आर्थिक गुन्ह्यांची तपासणी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गेल्या चार वर्षांच्या तुलनेत सरत्या वर्षांत तब्बल ५०५ पट अधिक गुन्हे नोंदविल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०१८-१९ या आर्थिक वर्षात ईडीने एकूण १९५ गुन्हे नोंदविले होते तर, २०२१-२२ या वर्षामध्ये ईडीने १,१८० गुन्ह्यांची नोंद केली आहे.

विशेष म्हणजे, केवळ गुन्हेच नव्हे तर ईडीकडून होणाऱ्या छापेमारीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याची माहिती आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून उपलब्ध माहितीनुसार, २००४ ते २०१४ या कालावधीमध्ये ईडीने देशभरात एकूण ११२ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीच्या माध्यमातून एकूण ५,३४६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली, तर २०१४ ते २०२२ या कालावधीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशभरामध्ये २,९७४ ठिकाणी छापेमारी केली आणि या माध्यमातून तब्बल ९५ हजार ४३२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. 

मोबाइल गेमिंग ॲप कंपन्या रडारवर

राजकीय पक्ष व नेते यांच्यावरील कारवाईत एकीकडे वाढ झालेली असतानाच गेल्यावर्षी मोबाइल ॲप, क्रिप्टो करन्सी आदी माध्यमांतून होणाऱ्या व्यवहारांत देखील मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या गुन्ह्यांची ईडीने नोंद केली आहे.

मोबाइल गेमिंग ॲपच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा घोटाळा झाल्याचे प्रकरण गेल्यावर्षी या तपास यंत्रणेने उजेडात आणले होते, तर मोबाइल ॲपच्या माध्यमातून कर्ज देत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर देखील ईडीने कारवाईचा मोठा बडगा उगारला होता. या प्रकरणी ६०० पेक्षा जास्त कंपन्यांची झाडाझडती घेण्यात आली होती.

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबई