शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माफीचा साक्षीदार होण्याची वाझेची अनुमती ईडीने नाकारली; कारण अस्पष्ट, वाझे पुन्हा आरोपी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 07:45 IST

गेल्यावर्षी जूनमध्ये ईडीच्या विशेष न्यायालयात ईडीने सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार होण्याची दिलेली अनुमती ईडीने रद्द केल्याचे समजते. मात्र, असा निर्णय ईडीने का घेतला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. माफीचा साक्षीदार होणे रद्द झाल्यामुळे पुन्हा एकदा वाझे या प्रकरणात आरोपी असेल. 

उपलब्ध माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारचालकांकडून दरमहा अवैधरित्या १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश वाझे याला दिले होते, असा दावा करत सीबीआयने उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एप्रिल, २०२१ मध्ये देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केली होती. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्याआधारे ईडीने अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. तसेच वाझे याने देशमुख यांच्या सांगण्यावरून चार कोटी रुपये जमा केल्याचा दावा ईडीने आपल्या आरोपपत्राद्वारे केला होता.

गेल्यावर्षी जूनमध्ये ईडीच्या विशेष न्यायालयात ईडीने सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. ईडीने अशी भूमिका घेतल्यानंतर सीबीआयनेही वाझेला माफीचा साक्षीदार होण्याची अनुमती दिली होती. मात्र, गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये देशमुख यांना जामीन मंजूर करतेवेळी उच्च न्यायालयाने वाझेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. वाझेच्या निवेदनावर अवलंबून राहणे ‘सुरक्षित’ नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले होते. दरम्यान, अँन्टिलिया इमारतीच्या बाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी याच प्रकरणाशी संबंध असलेल्या मनसुख हिरेन हत्याप्रकरणी वाझे अद्यापही एनआयएच्या अटकेत आहे. 

माफीचा साक्षीदार पुन्हा आरोपी कसा?एखाद्या व्यक्तीला तपास यंत्रणेने माफीचा साक्षीदार म्हणून मान्यता दिली असेल, पण त्या व्यक्तीने काही माहिती दडवली अथवा चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली, तर त्याला माफीचा साक्षीदार होण्यास दिलेली मान्यता रद्द करता येते. तसेच, त्याला पुन्हा आरोपी बनवून त्याच्या विरोधात केस चालवली जाते.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझे