शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चंदामामा मासिकाच्या मालकांना ईडीचा दणका, ४० कोटींची मालमत्ता जप्त

By मनोज गडनीस | Updated: October 10, 2023 21:18 IST

२६ फ्लॅट, दुकाने ताब्यात; यापूर्वीही १६ कोटींची मालमत्ता केली होती हस्तगत

मनोज गडनीस, मुंबई: लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या चंदामामा या मासिकाची निर्मिती करणाऱ्या तसेच दुसरीकडे सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिओदेसिक या कंपनीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत कंपनीची ४० कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये २६ फ्लॅट्स व काही दुकानांचा समावेश आहे. यापूर्वी देखील ईडीने कंपनीची १६ कोटी ५२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

कंपनीच्या समभाग धारकांच्या पैशांवर डल्ला मारत ते हडप करत खाजगी मालमत्तांची खरेदी केल्याप्रकरणी २०१८ मध्ये कंपनीच्या संचालकांविरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. मात्र, देशातच नव्हे तर परदेशात देखील कंपनीने काही क्लिष्ट आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. उपलब्ध माहितीनुसार, २००८ मध्ये कंपनीने १२५ मिलियन अमेरिकी डॉलर इतक्या महाकाय रकमेच्या परदेशी रोख्यांची विक्री केली होती. परेदशात काही कंपन्यांची खरेदी करणे तसेच मूळ कंपनीचा विस्तार करण्यासाठी या पैशांची उभारणी केल्याचा दावा कंपनीने त्यावेळी केला होता. मात्र, तसे न करता रोख्यांच्या विक्रीतून आलेला पैसा कंपनीने आपल्या भारतातील मूळ कंपनीत पाठवला. या मूळ कंपनीने सॉफ्टवेअरच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे सांगत ते पैसे सहा बनावट कंपन्यांत वळवले व तिथून ते पैसे वैयक्तिक खात्यात वळवत या मालमत्तांची खरेदी केली. या प्रकरणी ईडीने यापूर्वी कंपनीचे संचालक प्रशांत मुळेकर, पंकज श्रीवास्तव, किरण कुलकर्णी आणि कंपनीचा कर सल्लागार दिनेश जाजोडीया याला अटक केली  होती.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबई