शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

जीव्हीके कंपनीवर ‘ईडी’चे छापे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:04 IST

‘एमआयएएल’ घोटाळा : मुंबई, हैदराबादला कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिचालनातील मनी लाँड्रिंगप्रकरणी जीव्हीके समूहाच्या मुंबई आणि हैदराबाद येथील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छापे घातले. जीव्हीके समूहाच्या प्रवर्तकांच्या घरांवरही छापे मारण्यात आले.

७ जुलै रोजी ईडीने जीव्हीके पॉवर अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) आणि इतर काही कंपन्यांविरोधात मनी लॉँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. त्याआधी सीबीआयने जीव्हीके समूहाचे प्रवर्तक जीव्हीके रेड्डी, संजय रेड्डी, एमआयएएल आणि इतर नऊ कंपन्यांविरुद्ध सरकारचे ७०५ कोटी रुपयांचे नुकसान केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंदविला होता.

एमआयएएल ही जॉइंट व्हेंचर कंपनी असून, जीव्हीके समूहातील जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्ज, एअरपोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एएआय) आणि काही विदेशी कंपन्या यात भागीदार आहेत. यात जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्ज आणि एएआय यांची हिस्सेदारी अनुक्रमे ५०.०५ टक्के आणि २६ टक्केआहे.

सूत्रांनी सांगितले की, मुंबई आणि हैदराबादेतील एकूण नऊ ठिकाणी ईडीकडून तपासणी करण्यात येत आहे. ‘एमआयएएल’मधील निधी बेकायदेशीररीत्या वळवून प्रवर्तकांनी वैयक्तिक मालमत्ता खरेदी केल्या आहेत का, याची तपासणी ईडीकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरनुसार, अरोपींनी खर्च वाढवून दाखविणे, महसूल कमी दाखविणे आणि रेकॉर्डमध्ये फेरफार करणे या मार्गांचा वापर करून निधीचा अपहार केला.घोटाळ्याचे चार भागयाप्रकरणी सीबीआयने गेल्या महिन्यात धाडी टाकल्या होत्या. सीबीआयच्या एफआयआरमध्ये एमआयएएल घोटाळ्याचे पुढीलप्रमाणे चार भाग करण्यात आले आहेत.च्बनावट कंत्राटी कामे दाखवून निधी हडपणे.च्खर्च वाढवून दाखवून एमआयएएलचा राखीव निधी अन्यत्र वळविणे.च्रिलेटेड-पार्टी-कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून एमआयएएलचा महसूल कमी दाखविणे.च्एमआयएएलच्या निधीतून जीव्हीके समूहाच्या प्रवर्तकांचे तसेच कुटुंबीयांचे खर्च भागविणे.