शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आयपीओ घोटाळाप्रकरणी तिघांना ईडीकडून अटक; मुंबईतील शेअर दलालाचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 10:35 IST

तिघांना २५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या हैदराबादस्थित तक्शील सोल्युशन्स लि. या कंपनीने शेअर बाजारात सहभागी होण्यासाठी केलेल्या प्राथमिक समभाग विक्रीच्या किमतीमध्ये (आयपीओ) घोटाळा केल्याप्रकरणी तसेच या आयपीओद्वारे मिळालेले पैसे हडप केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये कंपनीच्या दोन संचालकांसह निर्मल कोटेचा या मुंबईस्थित शेअर दलालाचाही समावेश आहे. तिघांना २५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने समभाग विक्री करत भांडवल उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, समभागांची किंमत जास्त मिळावी, याकरिता कंपनीच्या आर्थिक उलाढालीमध्ये बनावटरीत्या मोठ्या प्रमाणावर वाढ दाखवली होती. त्या आधारे कंपनीने समभागाची किंमत जास्त मिळवण्याचा प्रयत्न केला. कंपनीने शेअर बाजारात दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ५५ लाख समभागांची विक्री प्रति समभाग १५० रुपयाने केली. याद्वारे कंपनीला ८० कोटी ५० लाख रुपये मिळाले.  

असा उघडकीस आला घोटाळा ८० कोटी रुपयांपैकी ३५ कोटी ५० लाख रुपये कंपनीने अमेरिकास्थित एका कंपनीला तिच्याकडून काही सेवासुविधा घेतल्याचे दाखवत दिले. मात्र, तिथून हे पैसे सिंगापूरस्थित व हाँगकाँगच्या एका कंपनीत फिरवले. सिंगापूर व हाँगकाँग येथील या कंपन्या तक्शील कंपनीच्या संचालकांच्या मालकीच्या असल्याचे तपासात दिसून आले. या पद्धतीने हे पैसे लाटले गेले. तर, याच रकमेतील २३ कोटी रुपये कंपनीने सॉफ्टवेअर खरेदीकरिता खर्च झाल्याचे दाखवले. मात्र, हे पैसे देखील पुन्हा सिंगापूर व हाँगकाँग येथील त्याच कंपनीत पोहोचले.  उर्वरित १८ कोटी रुपये समभाग विक्रीचा खर्च, विविध व्यापाऱ्यांची देणी, कंपनीच्या विस्तार कामाचा खर्च आदींकरिता झाल्याचे दाखविण्यात आले. भांडवली बाजार नियंत्रक संस्था असलेल्या सेबीने ईडीकडे गुन्हा दाखल केला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी