शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

पेटीएम, कॅश फ्री कंपन्यांना ईडीचा दणका; मुंबई, पुण्यासह देशात १६ ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 06:19 IST

गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल ॲपवरून देण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण वाढले होते. तसेच सर्वसामान्य ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत होती.

मुंबई : मोबाईल ॲपच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या कंपन्यांवरील कारवाई ईडीने तीव्र करत मुंबई, पुण्यासह देशभरात १६ ठिकाणी छापेमारी केली. त्यात पेटीएम, कॅश फ्री, ईझ बझ या आणि अन्य काही प्रमुख पेमेंट गेट वे कंपन्यांची एकूण ४६ कोटी ६७ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल ॲपवरून देण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण वाढले होते. तसेच सर्वसामान्य ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत होती. त्यामुळे ईडीने या ॲप कंपन्यांचा तपास हाती घेतला. त्यानंतर त्यांचे मूळ मालक चीनचे नागरिक असल्याची माहिती पुढे आली होती. त्यात झालेल्या अवैध व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर ईडीने ही कारवाई तीव्र केली आहे. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरुसह देशात १६ ठिकाणी छापेमारी केली. पेमेंट गेट, क्रिप्टो करन्सी आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान सेवा देणाऱ्या कंपन्यांवर प्रामुख्याने छापेमारी झाली. या विविध कंपन्यांच्या कार्यालयांतून रोख रक्कम जप्त केली. 

सर्वाधिक रक्कम पुण्यातून जप्तईझ बझ कंपनीच्या पुणे कार्यालयातून ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्वाधिक म्हणजे ३३ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. तर रेजरपे कंपनीच्या बंगळुरु कार्यालयातून १ कोटी २८ लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. कॅश फ्री कंपनीच्या बंगळुरु कार्यालयातून १ कोटी ११ लाख रुपयांची रक्कम जप्ती करण्यात आली तर पेटीएम कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयातून १ कोटी ११ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या जप्तीमध्ये रोख रकमेसोबतच काही पैसा हा क्रिप्टो करन्सीत गुंतविल्याचे दिसून आले, तो पैसाही ईडीने जप्त केला आहे. 

पेटीएम कंपनीकडून छाप्याचे खंडनछाप्याच्या वृत्ताचे पेटीएम कंपनीने खंडन केले असून काही विशिष्ट मर्चंटसोबतच्या व्यवहारांची बँक खाती गोठविण्याचे निर्देश आम्हाला ईडीने दिल्याची प्रतिक्रिया पेटीएमने ट्विटरद्वारे दिली आहे. या पैशांशी पेटीएमचा कोणताही संबंध नसल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPaytmपे-टीएम