शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम उद्योगातील कंपनीवर ईडीची कारवाई, १३०० कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 06:17 IST

जप्त झालेल्या या मालमत्तेमध्ये भूखंड, व्यावसायिक जागा, घरे आणि बँक खात्यातील रक्कम आदींचा समावेश आहे.

मुंबई : घर आणि व्यावसायिक गाळ्यांच्या बांधकामाचे आश्वासन देत सामान्य ग्राहकांकडून पैसे घेत त्यांची फसवणूक करणाऱ्या आणि देशातील प्रमुख शहरांत बांधकाम उद्योगात कार्यरत असलेल्या आयरो समूहाची तब्बल १३१७ कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. जप्त झालेल्या या मालमत्तेमध्ये भूखंड, व्यावसायिक जागा, घरे आणि बँक खात्यातील रक्कम आदींचा समावेश आहे. शाओमी कंपनीवर ईडीने तीन महिन्यांपूर्वी जप्तीची कारवाई करत कंपनीची ५५०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर ईडीने केलेली ही जप्तीची दुसरी कारवाई आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दिल्लीसह देशातील अन्य काही प्रमुख शहरांत ललित गोएल यांची आयरो कंपनी बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र, दिल्ली आणि उत्तर भारतातील काही प्रमुख शहरांतून नवे बांधकाम प्रकल्प कंपनीने सादर केले. या माध्यमातून ग्राहकांना घर, तसेच व्यावसायिक गाळे देण्याचे आश्वासन कंपनीने दिले. मात्र, प्रत्यक्षात या प्रकल्पाकरिता ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करूनही कंपनीने त्या ग्राहकांना घरे अथवा व्यावसायिक गाळे दिले नाहीत. तसेच, या ग्राहकांना पैसेही दिले नाहीत.

कंपनीच्या संचालकांनी या पैशांचा अपहार केल्याचे लक्षात आल्यानंतर दिल्ली, गुरगाव, पंचकुला, लुधियाना आदी शहरांतून कंपनीच्या विरोधात तब्बल ३० एफआयआर दाखल झाल्या. या आर्थिक गैरव्यवहारांची व्याप्ती लक्षात घेता हा तपास ईडीने देखील सुरू केला होता. तसेच, कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष असलेल्या ललित गोएल याला १६ नोव्हेंबर २०२१ रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याच्या चौकशी दरम्यान जसजशी माहिती मिळत गेली त्या अनुषंगाने ईडीने आता कारवाई सुरू केली असून, गेल्या शनिवारी कंपनीची १३१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

ग्राहकांचा पैसा वापरला परदेशातील व्यवहारांसाठीईडीमधून मिळालेल्या माहितीनुसार, सामान्य ग्राहकांकडून कंपनीने जो कोट्यवधींचा निधी गोळा केला, त्या पैशांचा वापर प्रकल्पाचे काम करण्यासाठी न करता परदेशातील व्यवहारांकरिता केला. तसेच, काही लोकांना कर्ज रुपाने देखील हे पैसे दिले. तर कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याच्या रुपाने मोठ्या प्रमाणावर पैसे देण्यात आल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयbusinessव्यवसाय