शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीदरम्यान पत्नीला मिळाली पतीच्या मृत्यूची बातमी, आरजेडी नेत्याची हत्या  

By पूनम अपराज | Updated: December 26, 2020 21:06 IST

Murder : एकीकडे त्या चिमुकलीचा आनंद तर दुसरीकडे एकुलता एक मुलगा रवी यांच्या मृत्यूच्या दुःखाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ठळक मुद्देभोजपूरच्या आरा येथील शेहरी गावात राहणारा हरिद्वार सिंग याचा मुलगा आणि युवा नेता रवि यादव याला अज्ञात लोकांनी गोळ्या घालून ठार मारले.

दोन दिवसांपूर्वी बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते रवि यादव यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रवि यांच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचली, त्याचवेळी त्यांच्या घरी त्यांची पत्नी प्रसूतीच्या वेदनेत होती. आता मृताच्या पत्नी प्रियांशु देवीने एका मुलीला जन्म दिला आहे. परंतु एकीकडे त्या चिमुकलीचा आनंद तर दुसरीकडे एकुलता एक मुलगा रवी यांच्या मृत्यूच्या दुःखाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

भोजपूरच्या आरा येथील शेहरी गावात राहणारा हरिद्वार सिंग याचा मुलगा आणि युवा नेता रवि यादव याला अज्ञात लोकांनी गोळ्या घालून ठार मारले. गुरुवारी सकाळी  रामडीहरा  रोडच्या काठावरील  करहा  येथे रविचा मृतदेह सापडला. तो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. याच वर्षी रवीचे चारपोखरी पोलिस ठाण्यातील  दुलौर  गावच्या प्रियांशुशी लग्न झाले. प्रियांशु गर्भवती होती. पण, रवि यादव आपल्या मुलीला पाहण्यापूर्वीच या जगातून निघून गेला. एकीकडे अंत्ययात्रेची तयारी सुरु होती, तर दुसरीकडे पत्नीला प्रसूतीच्या वेदना असाह्य होऊ लागल्या होत्या. त्यानंतर प्रियांशुला गडहनी  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आणि तेथेच तिने एका मुलीला जन्म दिला.मृत  रवी यादव बुधवारी संध्याकाळी मंदुरी येथील आपल्या घरातून मोटारसायकलने घरी येण्यास निघाल्याची माहिती आहे. पण उशीरापर्यंत ते घरी पोहोचला नाही. कुटुंबीयांनी तपास सुरू केला असता गुरुवारी सकाळी मोटारसायकलसह रविचा मृतदेह गावाजवळ पडला. मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरुन तीन खोके देखील जप्त करण्यात आल्या असून त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याचा संशय आहे.घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांनी, स्थानिक लोकांनी आणि आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी आणि  त्यांच्या मागण्यांसाठी मृतदेहासह आरा-सासाराम राज्य महामार्ग रोखला होता. मात्र, डीएसपीने मारेकऱ्यांना अटक करण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर जाम झालेला महामार्ग खुला करण्यात आला. यानंतर मृतदेह आरा सदर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याक्षणी अद्याप हत्येच्या गुन्ह्याची उकल झालेली नाही. पोलीस तपास सुरू आहे. याप्रकरणी अज्ञात लोकांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :MurderखूनBiharबिहारPoliceपोलिसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलFiringगोळीबार