शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी दुकली गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 20:39 IST

या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

ठळक मुद्दे श्रीनिवास मल्लेश नालमादी (४१) याचा  धंदा दुधविक्रीची असून  नवशक्ती  नगर आदर्श नगर, लोटस पेट्रोल पंपाजवळ राहतो. तर जानया लिगय्या बट्टू (४२) याचा देखील धंदा दुधविक्रीचा असून तोही वरील पत्त्यावर राहतो. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात श्रीनिवास आणि जानया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई - जोगेश्वरी पश्चिमेकडील आदर्श नगर येथील नवशक्ती नगर परिसरात प्रसिद्ध दूध कंपन्यांच्या दुधाच्या पिशवीत दूषित पाणी मिसळून ते दूध ग्राहकांना वितरित करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या कक्ष - ९ ने अटक केली आहे. कक्ष - ९ चे पोलीस उपनिरीक्षक विजयेंद्र आंबवडे यांना खात्रीलायक खबऱ्याकडून याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार मिळालेल्या माहितीची शहनिशा करून कारवाई करण्यात आली. श्रीनिवास मल्लेश नालमादी (४१) याचा  धंदा दुधविक्रीची असून  नवशक्ती  नगर आदर्श नगर, लोटस पेट्रोल पंपाजवळ राहतो. तर जानया लिगय्या बट्टू (४२) याचा देखील धंदा दुधविक्रीचा असून तोही वरील पत्त्यावर राहतो. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

 

पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन आणि बृहन्मुंबई महाराष्ट्र शासन येथील अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह आज पहाटे ५ वाजता धाड टाकली. त्यावेळी त्यांनी दूध भेसळ करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळी २३३ लिटर भेसळयुक्त दूध जागीच नष्ट करण्यात आले. तसेच दूध भेसळीसाठी वापरलेले सामान हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात श्रीनिवास आणि जानया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबईmilkदूध