शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिवसेना उपविभागप्रमुखावर गोळीबार करण्यासाठी परदेशातून मिळाली होती सुपारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 19:01 IST

खंडणी विरोधी पथकाची कामगिरी; दोघांना अटक 

ठळक मुद्देसागर मिश्राच्या अधिक चौकशीनंतर मध्यप्रदेश येथे गेलेल्या पथकाने कृष्णधर सिंग यास ताब्यात घेतले.  या दोघांना कोर्टात हजर केले असता १ जानेवारी २०२० पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे येथे गेलेल्या पथकाने आनंद फडतरेला ताब्यात घेतले.

मुंबई - गेल्या गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास विक्रोळी येथील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव हे नियमितपणे देवदर्शनासाठी साईबाबा मंदिर,टागोरनगर, विक्रोळी येथे गेले होते. देवदर्शन आटोपून ते मंदीरातील कार्यालयात बसले असताना अचानकपणे एका अनोळखी इसमाने आत येऊन त्यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाला दुखापत झाली. हल्लेखोर पळून जात असताना जखमी  जाधव व मंदिरातील इतर लोकांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने आणखी गोळीबार केला. मात्र, घटनास्थळी जमलेल्या लोकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून त्यास जागीच पकडले. पोलिसांनी अटक केलेल्या या शूटरचे नाव सागर मिश्रा असं आहे. सागर मिश्राच्या अधिक चौकशीनंतर मध्यप्रदेश येथे गेलेल्या पथकाने कृष्णधर सिंग यास ताब्यात घेतले. ठाणे येथे गेलेल्या पथकाने आनंद फडतरेला ताब्यात घेतले. या दोघांना कोर्टात हजर केले असता १ जानेवारी २०२० पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

गोळीबार करणाऱ्या सागर मिश्राला पकडताना झालेल्या मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यास गोळीबार करण्याचे कारण विचारले असता, 'प्रसाद पुजारी नेमारने के लिए भेजा है।' असे त्याने चंद्रशेखर जाधव यांना सांगितले. त्यानंतर जखमी जाधव व गोळीबार करणाऱ्या इसमास उपचारासाठी रूगणालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विक्रोळी पोलीस ठाण्यातून हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाने सुरु केला. या प्रकरणातील गोळीबार करणारा जखमी इसम हा गंभीर जखमी असल्याने सुरुवातीस बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता. नंतर तो स्वत:च्या नावासह सर्व माहिती खोटी सांगत असल्याने तपासकामात अडथळा निर्माण झाला होता. मात्र, आरोपीने ज्या रिव्हॉल्वरमधून जाधव यांच्यावर गोळीबार केला होता. ते रिव्हॉल्वर हे कानपुर आईनन्स फॅक्टरी येथील बनावटीचे असल्याने त्यांचेकडून लायसन्स धारकाची माहिती प्राप्त करण्यात आली.

पुढील तपासकामासाठी खंडणीविरोधी पथकाची आणखी तीन पथके ठाणे, मध्यप्रदेश आणि कर्नाटक येथे रवाना झाली. त्यानंतर मध्यप्रदेश येथे गेलेल्या पथकाने कृष्णधर सिंग यास ताब्यात घेतले तर ठाणे येथे गेलेल्या पथकाने आनंद फडतरे यास ताब्यात घेतले. त्यांचेकडे केलेल्या चौकशीत असे निदर्शनास आले की, परदेशास्थित गँगस्टर प्रसाद पुजारी याने सुरूवातीस मध्यप्रदेश येथील त्याचे साथीदार कृष्णधर सिंग व सागर मिश्रा (गोळीबार करणारा जखमी इसम) यांना जाधव यांच्यावर गोळीबार करण्याच्या उद्देशाने मुंबईत पाठविले होते. मुंबईत पोहचल्यानंतर प्रसाद पुजारी याच्या सांगण्यावरून त्याच्या मुंबईतील एका साथीदारांनी त्यांची राहण्याची सोय केली. त्यानंतर सदर साथीदाराला आरोपी आनंद फडतरे, राहणार - ठाणे याने विनानंबर प्लेटची मोटरसायकल पुरविली. ती मोटार सायकल घेऊन सिंग हा साथीदार गोळीबार करण्यासाठी सागर मिश्रा याच्यासह टागोरनगर येथे आला. चंद्रशेखर जाधव हे सदर ठिकाणी आल्याची खात्री करून सागर मिश्रा याने त्यांच्यावर गोळीबार केला.

टॅग्स :ArrestअटकFiringगोळीबारAnti Extortion Cellखंडणी विरोधी पथकPoliceपोलिसMumbaiमुंबईthaneठाणेMadhya Pradeshमध्य प्रदेशShiv Senaशिवसेना