शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Crime news: मागण्यांच्या त्रासाने मित्राने ‘तिला’ संपविले, तरुणीची पालघरला नेऊन केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 12:00 IST

Crime News: सांताक्रूझमधून बेपत्ता असलेल्या पिंकी क्लिफॉर्ड मिस्क्वित्ता (२९) या तरुणीच्या हत्येप्रकरणी तिचा मित्र झिको अंसलिम मिस्कित (२७) याला विलेपार्लेतून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. महागड्या भेटवस्तू, रोज फिरायला नेण्याच्या नेहमीच्या मागण्यांचा त्याच्या डोक्याला ताप झाला होता.

मुंबई : सांताक्रूझमधून बेपत्ता असलेल्या पिंकी क्लिफॉर्ड मिस्क्वित्ता (२९) या तरुणीच्या हत्येप्रकरणी तिचा मित्र झिको अंसलिम मिस्कित (२७) याला विलेपार्लेतून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. महागड्या भेटवस्तू, रोज फिरायला नेण्याच्या नेहमीच्या मागण्यांचा त्याच्या डोक्याला ताप झाला होता. त्या संपत नव्हत्या म्हणून कंटाळून तिलाच संपविले असे त्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ मधील अधिकाऱ्यांना सांगितले. पिंकी २४ डिसेंबरपासून बेपत्ता झाल्यावर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली. सांताक्रूझ पोलिसांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ चे अधिकारीही याचा तपास करीत होते. ज्यात पिंकीचा एक मित्र असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी झिकोला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. झिको सुरुवातीला काहीच माहिती देत नव्हता. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेच तिची हत्या केल्याची कबुली दिली. पिंकी त्याची जुनी मैत्रीण होती.झिकोचे अन्य मुलीवर प्रेम असल्याने अखेर पिंकीचा त्रास कायमचा संपवायचा असे त्याने ठरविले. त्याच्या कबुलीनंतर आरोपीला अधिक तपासासाठी कक्ष ९ ने पालघर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आहेर, नाळे, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. झिकोला मदत करणाऱ्या त्याच्या कुमार नावाच्या साथीदाराला पालघर पोलिसांनी विरारमधून अटक केली आहे.

दोघांत झाले भांडण२४ डिसेंबरला दुचाकीवरून दोघे पालघरला फिरायला गेले. तिच्या वागण्यावरून, भेटायला बोलावण्यावरून त्यांच्यात भांडण झाले आणि झिकोने २४ डिसेंबरच्याच रात्री पिंकीला जेट्टी परिसरात असलेल्या डोंगराळ भागात धक्का दिला. तेव्हा ती खाली पडली आणि गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्याने त्याची दुचाकी मित्र कुमारला घेऊन जाण्यास सांगत अन्य मित्रांसोबत ट्रिपल सीट परतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई