शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

कबुतरावरून शेजाऱ्यांमध्ये झालं कडाक्याचं भांडण अन् हत्या करून घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 14:04 IST

Murder : याबाबत तक्रार रणबीर सिंगच्या पत्नीने अमरगढ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. भा. दं. वि. कलम ३२०, १२० ब आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

ठळक मुद्देरणबीरची पत्नी जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा रणबीर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केले होते.

शेजाऱ्याचे कबुतर परत न केल्याने एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, संगरुरच्या भूमसी येथील रहिवासी असलेल्या रणबीर सिंग यांना कबूतर पाळण्याचा छंद होता. ४० वर्षाच्या रणबीरने शेजारी असलेल्या गुरप्रीत सिंग यांचं कबूतर परत करण्यास नकार दिला. यावरुनच दोघांमध्ये भांडण पेटलं. १६ दिवसांमध्ये रणबीरला २ वेळा अमानुषपणे मारहाण करण्यात आली. त्याच्यावर धारदार हत्यारांनी वारही केले गेले. २९ जानेवारील दुसऱ्यांदा झालेल्या मारहाणीनंतर उपचारादरम्यान रुग्णालयातच रणबीरचा मृत्यू झाला. याबाबत तक्रार रणबीर सिंगच्या पत्नीने अमरगढ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. भा. दं. वि. कलम ३२०, १२० ब आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

अमरगढचे एसएचओ सुखदीप सिंग म्हणाले की, कबूतर रणबीरच्या घरात घुसले होते. रणबीरने ते कबूतर शेजाऱ्यांना परत करण्यास नकार दिल्यानं मालक गुरप्रीत सिंग उर्फ प्रीतने काही साथीदारांसह १२ जानेवारीला रणबीरला बेदम मारहाण केली. तसेच रणबीरची पत्नी शरणजीत कौरने पोलिसांना माहिती दिली की, तिला १२ जानेवारीला रणबीरच्या ओरडण्याचा आवाज आला आणि ती आपली सासू बलजिंदर कौरसोबत घराबाहेर आली. तेव्हा आरोपी रणबीरला मारहाण करत होते. शरणजीत आणि बलजिंदर यांनी आरडाओरडायला केल्यानंतर आरोपींनी तिथून पळ काढला. त्यावेळी रणबीर आरोपींच्या तावडीतून सुटला. मात्र पुन्हा २९ जानेवारीला रणबीर, बलजिंदर कौर आणि रणबीरचा भाऊ दलजीत सिंग घरी होते. सायंकाळी ६ वाजता कोणीतरी घराबाहेरुन रणबीरला बोलावले. त्यावेळी गुरप्रीतच्या कबूतर विवाद मिटवण्यासाठी तुला शेतावर बोलवत आहे, असे सांगून रणबीरला बोलवण्यात आले होते. रणबीर आपल्या गाडीवर बसून घरुन निघाला. रात्री पावणेआठच्या दरम्यान शेजाऱ्याने रणबीरला कोणीतरी मारहाण करत असल्याचे सांगितले. 

माजी नगरसेवकाच्या आईची डोंबिवलीत हत्या, वृद्ध पतीने केले कृत्य

 

पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्वजण हादरले, आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या

रणबीरची पत्नी जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा रणबीर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केले होते. यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. २०१३ साली शरणजीत आणि रणबीरचा विवाह झाला होता. शरणजीतच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुरप्रीत, कमल गुरबख्श सिंग आणि अन्य व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी फरार आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसPunjabपंजाबpigeonsकबुतर