बिहारमधील लॉकडाऊनदरम्यान एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. पटनापासून ६० कि.मी. अंतरावर दुल्हन बाजारपेठेत एक विचित्र घटना घडली. लॉकडाऊनचा फायदा घेत पतीने पत्नी असतानाही गर्लफ्रेंडशी लग्न केले. याची माहिती पत्नीला मिळताच तिने पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देशात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी गुडिया देवी नावाची एक महिला अरवल येथे गेली जिथे तिचा मामा आहे. दरम्यान लॉकडाऊन जारी झाला आणि ती तिच्या माहेरी अडकली. नंतर तिला समजले की, तिचा नवरा धीरज कुमारने तिच्या अनुपस्थितीचा फायदा घेत गर्लफ्रेंडशी लग्न केले. धीरज आणि गुडिया यांनाही दहा वर्षाचा मुलगा आहे. पत्नीने गेल्या आठवड्यात दुल्हन बाजारपेठ पोलिस ठाण्यात जाऊन पतीविरोधात एफआयआर दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, धीरजकुमार यांनी या संपूर्ण घटनेविषयी केलेल्या युक्तिवादानुसार, त्याची पत्नी लॉकडाऊनमध्ये माहेरी अडकल्याने नाराज होता. तसेच वाहतुकीची सोया नसल्याने ती घरी परतणार नाही, त्यामुळे धीरज कुमार खूप चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या गर्लफ्रेंडशी लग्न केले. पत्नीने एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि धीरज कुमारला अटक करुन तुरूंगात पाठविले.गुडिया म्हणाली, “लॉकडाऊनचा फायदा घेत माझ्या नवऱ्याने पुन्हा लग्न केले. हे लग्न माझ्या इच्छेशिवाय केले गेले आहे. मी लॉकडाऊनमध्ये माझ्या माहेरी अडकले आणि परत येऊ शकलो नाही. म्हणूनच माझ्या पतीने दुसरे लग्न केले. "गुडिया देवीने सांगितले की, तिच्या पतीचा आधीपासूनच तिच्या मैत्रिणीशी संबंध होता. यामुळे घरात नवरा-बायकोमध्ये खूप भांडण झाले होते.
लॉकडाऊनमुळे माहेरी अडकली पत्नी म्हणून पतीने केले गर्लफ्रेंडशी लग्न अन्...
By पूजा बोरकर | Updated: April 24, 2020 22:56 IST
याची माहिती पत्नीला मिळताच तिने पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाऊनमुळे माहेरी अडकली पत्नी म्हणून पतीने केले गर्लफ्रेंडशी लग्न अन्...
ठळक मुद्देदेशात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी गुडिया देवी नावाची एक महिला अरवल येथे गेली जिथे तिचा मामा आहे.पत्नीने एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि धीरज कुमारला अटक करुन तुरूंगात पाठविले.