शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे जेवणाचे हाल, पतीने मोबाईल विकून आणून दिले अन्नधान्य अन् संपवले जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 23:21 IST

अनेकांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. असाच धक्कादायक प्रकार हरियाणा येथील गुडगावमध्ये घडला आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मूळचा बिहरमधील असणारा छाबु मंडल (३५) हा  कामगार आपल्या कुटुंबासहीत अडकून पडला.छाबुने अन्नधान्य आणल्यानंतर पूनम काही कामानिमित्त घराबाहेर पडली.

देशभरातील करोनाबाधितांचा आकडा वाढत असून केंद्र सरकारने लॉकडाउनचा दुसरा टप्पा देशभरात सुरु आहे. मात्र या निर्णयामुळे परराज्यातील मजुरांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. रोजंदारीवर म्हणजेच हातावर पोट असणारे हजारो कामगार वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. २२ मार्च रोजी पहिल्यांदा २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली तेव्हा रोजंदारीचे सर्व मार्ग बंद होणार असल्याने अनेक मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी निघाले. अनेकांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. असाच धक्कादायक प्रकार हरियाणा येथील गुडगावमध्ये घडला आहे. आत्महत्या करणारा छाबु हा मानसिक तणावात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी सकाळी यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरु केला. मात्र यासंदर्भात कोणतीही चौकशी केली जाऊ नये असं छाबुच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळेच पोलिसांनी या प्रकरणात एफआयआरही दाखल केलेली नाही.लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मूळचा बिहरमधील असणारा छाबु मंडल (३५) हा  कामगार आपल्या कुटुंबासहीत अडकून पडला. पेंटर म्हणून काम करणाऱ्या छाबुने घरातील आठ जणांचे पोट भरण्यासाठी आपला मोबाईल अडीच हजार रुपयांना विकला. त्यामधून घरी अन्नधान्य घेऊन आला. मात्र नंतर घरात इतर कुटुंबीय नसताना घराचा दरवाजा आतून लावून घेत छाबुने गळफास लावून आत्महत्या केली छाबुची पत्नी पूनमने सांगितले की, मोबाईल विकून मिळालेल्या पैशामधून छाबुने घरातील लोकांसाठी अन्नधान्य आणि एक पंखा विकत घेतला. छाबु आई-वडील, चार मुले आणि पत्नीसहीत राहत होता. आमचा सर्वात लहान मुलगा पाच महिन्यांचा आहे.मागील दोन दिवसांपासून आम्ही काहीच अन्न खाल्ले नाहीय. लॉकडाऊननंतर आम्ही अन्नासाठी शेजाऱ्यांवरच विसंबून होतो असंही पूनमने पुढे सांगितलं. छाबुने अन्नधान्य आणल्यानंतर पूनम काही कामानिमित्त घराबाहेर पडली. छाबुची आई आणि वडील मुलांना घेऊन घरासमोरच्या झाडाखाली बसले होते. घरात कोणीही नसल्याने संधीचा फायदा घेऊन छाबुने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHaryanaहरयाणाMobileमोबाइल