शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत ७ ठिकाणी १२ कोटींचे ड्रग्ज जप्त ; ११ नायजेरियनना अटक; पहाटेपर्यंत धाडसत्र सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:50 IST

नवी मुंबईत ड्रग्ज विक्रेत्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गतवर्षी खारघर येथे नायजेरियन व्यक्तींच्या अड्ड्यावर छापा टाकून थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये पुरवले जाणारे ड्रग्ज जप्त केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवायांमध्ये १२ कोटींचे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले आहे. याप्रकरणी ११ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत पोलिसांचे हे धाडसत्र शहरभर सुरू होते.

नवी मुंबईत ड्रग्ज विक्रेत्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. गतवर्षी खारघर येथे नायजेरियन व्यक्तींच्या अड्ड्यावर छापा टाकून थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये पुरवले जाणारे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानुसार यंदाही थर्टी फर्स्टच्या अगोदरच पोलिसांनी ड्रग्ज विक्रेत्या टोळ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबवली. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकामार्फत ड्रग्ज विक्रीत सक्रिय असलेल्या नायजेरियन टोळ्यांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकांनी गुरुवारी रात्री एकाच वेळी परिमंडळ एक व दोनमधील सात ठिकाणी छापे टाकले.

वाशी, कोपर खैरणे, नेरूळ, तळोजा, खारघर परिसरात वास्तव्याला असलेल्या नायजेरियन व्यक्तींची झाडाझडती घेण्यात आली. त्यात ८ नायजेरियन व्यक्तींकडे एकूण १२ कोटींचे विविध प्रकारचे ड्रग्स मिळून आले, तर तीन नायजेरियन व्यक्ती बनावट कागदपत्रांद्वारे भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले. या एकूणच कारवाईत ११ नायजेरियन नागरिकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

शहरात आश्रयदीड वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालवणाऱ्या नायजेरियन व्यक्तींवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यानंतर अनेकदा ठिकठिकाणी छापे टाकून ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांचे कंबरडे मोडण्याचे काम पोलिसांमार्फत झाले आहे. त्यानंतरदेखील नायजेरियन व्यक्तींकडून शहरात छुपा आश्रय मिळवून ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालवले जात असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ