शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Drugs case: बॉलिवूडमधील अनेक बड्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरांवर एनसीबीची छापे

By बाळकृष्ण परब | Published: November 08, 2020 11:54 AM

Bollywood Drugs case News : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये ड्र्ग्सचा अँगल समोर आल्यापासून एनसीबीने ड्रग्स रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

ठळक मुद्दे एनसीबीने बॉलीवूडमधील अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरांवरा छापे मारले एनसीबीच्या पथकाने कुठल्याही निर्माता आणि दिग्दर्शकाच्या नावांचा उलगडा न करता ही नावे गुपित ठेवली कारवाईमध्ये काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरामधून काही प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले

मुंबई - ड्र्ग्स रॅकेट प्रकरणी एनसीबीने पुन्हा एकदा जोरदार कारवाईस सुरुवात केली आहे. एनसीबीने मुंबईतीलबॉलिवूडमधील अनेक बडे निर्माते आणि दिग्दर्शकांच्या घरांवर छापे टाकले आहेत. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये ड्र्ग्सचा अँगल समोर आल्यापासून एनसीबीने ड्रग्स रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार काही सिनेकलाकारांवर कारवाई केल्यानंतर आता एनसीबीने बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरांवरा छापे मारले आहेत. मात्र एनसीबीच्या पथकाने कुठल्याही निर्माता आणि दिग्दर्शकाच्या नावांचा उलगडा न करता ही नावे गुपित ठेवली आहेत. एनसीबीने ही कारवाई मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैरणे या पाच ठिकाणी केली.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईमध्ये शनिवारी रात्री अनेक बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरांवर छापेमारी केली. या कारवाईमध्ये काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरामधून काही प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, काल रात्रीपासून सुरू असलेली ही छापेमारी अजूनही सुरू आहे.

एनसीबीने ड्रग्स रॅकेट प्रकरणात ज्या ड्रग्स पेडलरना अटक केली होती त्यापैकी काही जणांनी बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा पुरवठा करत असल्याचे मान्य केले आहे. या ड्र्ग्स पेडलरच्या जबानींच्या आधारावरच एनसीबीने ही कारवाई केली आहे.

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbaiमुंबईbollywoodबॉलिवूड