शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बावनचाळीमध्ये होतोय अमली पदार्थांचा व्यापार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 01:59 IST

हा परिसर निर्जन असल्याने या ठिकाणी दिवसाढवळ्या, तसेच रात्री बिनदिक्कतपणे अवैध धंदे सुरू असतात. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, प्रेमी युगुलांचा सकाळपासूनच या ठिकाणी राबता असतो. एकीकडे अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू असताना, दुसरीकडे एकट्या-दुकट्या जाणाऱ्या मुली, तरुणींचा विनयभंग, बलात्कार झाल्याचे प्रकार या ठिकाणी या आधी घडले आहेत

डोंबिवली : अनैतिक धंद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बावनचाळीतील पडक्या वास्तुंलगतच्या परिसराचा वापर अमली पदार्थांच्या व्यापारासाठी होत असल्याचे विष्णूनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. बावनचाळ परिसरातील रेल्वेग्राउंड असो, अथवा तेथील पडक्या, भग्नावस्थेतील वास्तूंच्या भागात बिनदिककतपणे दारूच्या पार्ट्या झोडल्या जात असताना आता गांजाच्या विक्रीसाठी आलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा परिसर निर्जन असल्याने या ठिकाणी दिवसाढवळ्या, तसेच रात्री बिनदिक्कतपणे अवैध धंदे सुरू असतात. महाविद्यालयीन तरुण-तरुणी, प्रेमी युगुलांचा सकाळपासूनच या ठिकाणी राबता असतो. एकीकडे अश्लील चाळ्यांचे प्रकार सुरू असताना, दुसरीकडे एकट्या-दुकट्या जाणाऱ्या मुली, तरुणींचा विनयभंग, बलात्कार झाल्याचे प्रकार या ठिकाणी या आधी घडले आहेत. येथील मोडकळीस आलेल्या खोल्यांच्या परिसरात गांजाचा व्यापार जोमाने चालत असल्याची सूत्राची माहिती आहे. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता एक व्यक्ती गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत विष्णुनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांच्यासह त्यांच्या पथकाने परिसरात सापळा लावला असता, एक व्यक्ती संशयितरीत्या फिरताना आढळला.  ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गांजा मिळून आला. समीर हरिश्चंद्र भोईर (वय ३२) असे त्याचे नाव असून, तो पश्चिमेकडील उमेशनगरमध्ये वास्तव्याला आहे.  तो गांजा विक्रीसाठी आला होता. त्याच्याकडे एक किलो वजनाचा गांजा आणि काही रोख रककम आढळली. अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ