ड्रग्ज चाचणी पॉझिटीव्ह, तरी सिद्धांत कपूरला पोलिसांनी जामिनावर सोडले; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 11:28 AM2022-06-14T11:28:06+5:302022-06-14T11:29:10+5:30

Siddhanth Kapoor Drug Case: रेव्ह पार्टीमध्ये १४ तरुणी आणि २१ पुरुष होते. सर्व लोकांनी आपण ड्रग्ज घेतले नसल्याचे चौकशीत पोलिसांना सांगितले होते.

Drug test positive, Actor Siddhanth Shakti Kapoor released on bail after arrest over consumption of drugs | ड्रग्ज चाचणी पॉझिटीव्ह, तरी सिद्धांत कपूरला पोलिसांनी जामिनावर सोडले; कारण काय?

ड्रग्ज चाचणी पॉझिटीव्ह, तरी सिद्धांत कपूरला पोलिसांनी जामिनावर सोडले; कारण काय?

Next

बॉलीवूडचा अभिनेता सिद्धांत कपूरला जामीन मिळाला आहे. रेव्ह पार्टीवर छापा टाकून बंगळुरू पोलिसांनी रविवारी रात्री त्याच्यासह सहा जणांना अटक केली होती. वैद्यकीय चाचणीत सिद्धांतने ड्रग्जचे सेवन केल्याचे समोर आले होते. सिद्धांत हा ज्येष्ठ अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. 

आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना जामीन मिळाला आहे. बेंगळुरुचे विभागिय डीसीपी भीमा शंकर यांनी सांगितले की, सिद्धांतसह आणखी चार जणांना जामिन मिळाला आहे. जेव्हा पोलीस चौकशीला बोलावतील तेव्हा त्याला यावे लागणार आहे. जामिन मिळालेल्यांमध्ये सिद्धांत कपूर, अखिल सोनी, हरजोत सिंह, हनी, अखिल यांचा समावेश आहे. बंगळूरूतील एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरु होती, तिथे सिद्धांतही होता. तो तिथे डीजेचे काम करत होता. 




सिद्धांतकडे ड्रग्ज सापडलेले नाही, परंतू डस्टबीनजवळ ड्रग्ज सापडले होते. डस्टबीनजवळ गांजा आणि एडीएमए पडलेले होते. यामुळे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाणार आहे. याद्वारे कोणी ड्रग्ज तिथे टाकले व नष्ट करण्याचा प्रयत्न केला हे समोर येईल त्यानंतरच पुढील कारवाईची दिशा ठरेल असे शंकर यांनी सांगितले. 

रेव्ह पार्टीमध्ये १४ तरुणी आणि २१ पुरुष होते. सर्व लोकांनी आपण ड्रग्ज घेतले नसल्याचे चौकशीत पोलिसांना सांगितले होते. परंतू, सिद्धांत कपूर आणि अन्य चार जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 

Web Title: Drug test positive, Actor Siddhanth Shakti Kapoor released on bail after arrest over consumption of drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.