शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पहिल्यांदा पाणबुडीमधून अमली पदार्थाची तस्करी; ८६३ कोटींचे कोकेन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 19:15 IST

स्पेनच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले ८६३ कोटींचे कोकेन

ठळक मुद्देप्रवासादरम्यान या पाणबुडीवर लक्ष ठेवले जात होते.पाणबुडी दक्षिण अमेरिकेतून अटलांटिक महासागरामार्गे युरोपमध्ये आणली जात होती. ज्या पाणबुडीतून अमली पदार्थाची तस्करी करण्यात आली ती पाणबुडी ६५ फूट लांब आहे.

लिस्बन - पोर्तुगालमध्ये प्रथमच पाणबुडीमधून अमली पदार्थाच्यातस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोर्तुगालच्या गॅलिसियामधून स्पेनच्या अधिकाऱ्यांनी जवळपास ८६३ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले. इक्वेडोरमधील २ लोकांना अटक करण्यात आली आहे, स्पॅनिशचा रहिवासी असलेला एक आरोपी फरार झाला आहे. पाणबुडी दक्षिण अमेरिकेतून अटलांटिक महासागरामार्गे युरोपमध्ये आणली जात होती. पाणबुडीने एकूण ७६९० कि.मी.चा प्रवास केला. प्रवासादरम्यान या पाणबुडीवर लक्ष ठेवले जात होते.तस्कर नवीन मार्ग शोधत आहेतज्या पाणबुडीतून अमली पदार्थाची तस्करी करण्यात आली ती पाणबुडी ६५ फूट लांब आहे. याची किंमत सुमारे २० कोटी असल्याचे म्हटले जाते. दक्षिण अमेरिकन ड्रग्स माफिया जगात ड्रग्सची तस्करी करण्यासाठी नवनवीन पद्धती वापरत असल्याचे स्पॅनिश अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पकडलेल्या कोकेनच्या तस्करीमागे एक मोठा तस्करांचा गट असू शकतो.बरेच दिवस देखरेख ठेवली जात होती या पाणबुडीवर स्पॅनिश वृत्तपत्र एबीसीच्या म्हणण्यानुसार, अधिकारी १५ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या मदतीने पाणबुडीवर लक्ष ठेवून होते. पोर्तुगालमधील किनारी थांबल्यानंतर धाड घालून पोलिसांनी पाणबुडी  हस्तगत करण्यात आली. दक्षिण अमेरिकेच्या गयाना आणि सुरिनाम या देशांमध्ये पाणबुडी तयार केली गेली होती. पाणबुडी कोणत्या देशातून निघाली हे अधिकाऱ्यांना अद्याप माहिती नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलिसांना ही पाणबुडी कोलंबियातुन आल्याची  माहिती मिळाली आहे. मात्र, अधिकाऱ्यांना याची  खातरजमा केली नसली तरी पाणबुडीची ३ मेट्रिक टन सामान वाहून नेण्याची क्षमता असल्याचेही अहवालात म्हटले आहे.२००६ मध्ये अधिकाऱ्यांनी स्पेनमधील विगो येथून घरगुती बांधलेली पाणबुडी पकडली होती. नंतर सहा जणांना अटक करण्यात आली होती. सर्वांना प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. हे लोक कोकेनचे तस्कर होते.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसInternationalआंतरराष्ट्रीयSmugglingतस्करी