शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ब्राउन शुगरसह अमली पदार्थांच्या तस्करांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 02:14 IST

Crime News : स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, भास्कर जाधव आदींचे पथक २१ डिसेंबर रोजी गणेशपुरी मुरबाड उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत होते.

ठाणे : ब्राउन शुगरसह अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जाहीद शेख (३०, रा. मुठवल, भिवंडी) आणि ईश्वर मिश्रा (३९, रा. उत्तर प्रदेश) या दोघांना भिवंडी पिसे रोडवरील सावद येथून ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी १३ लाख ७९ हजारांचे ब्राउन शुगर आणि एमडी पावडर हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, भास्कर जाधव आदींचे पथक २१ डिसेंबर रोजी गणेशपुरी मुरबाड उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिसा डॅमच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दोघे जण उभ्या कारमध्ये संशयास्पद हालचाली करताना आढळल्याने त्यांना या पथकाने ताब्यात घेतले. जाहीद आणि ईश्वर अशी नावे सांगणाऱ्या या दोघांच्या कारची या पथकाने झडती घेतली, तेव्हा त्यांच्या डिक्कीतील डब्यातून एक किलो ७० ग्रॅम वजनाचे ब्राउन शुगर व एक किलो ७०० ग्रॅम वजनाची एमडी पावडर, तसेच एक डिजिटल वजन काटा असा एक कोटी १३ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. त्यांनी या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.

२६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीपोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी