शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज तस्कराने अटकेच्या कारवाईविरोधात केला हल्ला; एनसीबीचे दोन अधिकारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 17:43 IST

Drug Case : नवी मुंबईतून नायजेरियन ड्रग्ज तस्कराला बेडया

मुंबई :  कोकेनच्या कोलंबिया ते मुंबई व्हाया ईथोपिया या आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा सक्रिय सदस्य असलेल्या नायजेरीयन ड्रग्ज तस्कराला राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) नवी मुंबईतून शुक्रवारी पहाटे बेडया ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १०२ ग्रॅम  कोकेन जप्त करण्यात आले आहे. या कारवाई दरम्यान एनसीबीचे दोन अधिकारी जखमी झाले आहेत.

 एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेड़े यांनी दिलेल्या माहितीनुसार, खारघर येथील सेक्टर ३० येथे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून स्टिफन सँम्युअल उर्फ टोनी याला ताब्यात घेतले. त्याच्याकड़ून १०२ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.

टोनी हा कोलंबिया ते मुंबई व्हाया ईथोपिया या आंतरराष्ट्रीय कोकेनच्या तस्करी रॅकेटचा सक्रीय सदस्य आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबीच्या रडारवर होता. कोकेनच्या कोलंबिया ते मुंबई व्हाया ईथोपिया या आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा स्टीपन हा सक्रीय सदस्य आहे. एनसीबीचे पथक गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आणि दिल्ली येथे त्याचा शोध घेत होते. तो नुकताच दिल्लीवरून मुंबईत कोकेनचा पुरवठा करण्यासाठी आला होता. अखेर तो एनसीबीच्या हाती लागला. यावेळी अटकेला विरोध करत स्टीपनने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात एनसीबीचे दोन अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. यात स्टीपन विरुद्ध सहकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी एनसीबीचे पथक अधिक तपास करत आहेत.

२२ परदेशी ड्रग्ज तस्कर जाळयातएनसीबीने आता पर्यंत  यावर्षी जानेवारी पासून २२ परदेशी ड्रग्ज तस्करावर कारवाई केली आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई