शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांकडून ड्रोन कॅमेराने पोलिसांच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 12:26 IST

Naxalites drone: अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोलीस ठाण्याच्या परिसरात रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास आकाशात ड्रोन फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात नक्षलवाद्यांनी ड्रोन कॅमेराने पोलिसांच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच गोळीबार करून तो प्रयत्न हाणून पाडला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिमलगट्टा पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या घटनेला दुजोरा दिला, पण तो ड्रोन नक्षलवाद्यांचा होता की आणखी कोणाचा हे आताच सांगू शकणार नसल्याचे ते म्हणाले.प्राप्त माहितीनुसार, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पोलीस ठाण्याच्या परिसरात रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास आकाशात ड्रोन फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. लागलीच सर्वजण सतर्क झाले, पण काही वेळातच ते ड्रोन गायब झाले. त्यानंतर मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास पुन्हा ड्रोन दिसताच सतर्क असलेल्या पोलिसांची त्यावर गोळीबार केला. पण नक्षलवादी हल्ला करण्याची शक्यता पाहता रात्रीच्या अंधारात पोलीस परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेऊ शकले नाही. सकाळपासून त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान वाढविण्यात आले. पोलिसांच्या हालचाली टिपण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर होण्याची ही घटना नक्षलविरोधी अभियानासाठी नवीन आव्हान ठरू शकते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस