शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकाने पोलिसाला धडक देत नेले फरफटत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 07:06 IST

पोलीस अंमलदार जखमी; मध्यस्थी करणाऱ्या दुकलीकडूनही दमदाटी 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकाने पोलिसाला धडक देत फरफटत नेल्याचा प्रकार आझाद मैदान पोलिसांच्या हद्दीत घडला. यात अन्य सहकाऱ्याने चालकाला पकडून कारवाई करीत असतानाच तेथे धडकलेल्या दुकलीने मोबाइल शूटिंग करून पोलिसांना शिवीगाळ करीत धमकावले. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवत तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. आझाद मैदान वाहतूक शाखेत कार्यरत पोलीस हवालदार विजय भिवराव  असवले यात जखमी झाले. 

असवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ मार्च रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास डी. एन. रोड येथे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्ससमोर असवले हे वॉर्डनसोबत कार्यरत होते. नाकाबंदीची कारवाई सुरू असताना, रात्री पावणेदहाच्या सुमारास एक तरुण जे. जे. ब्रिजच्या दिशेने भरधाव वेगाने येताना दिसला. ब्रिजवर दुचाकी वाहनांना बंदी असल्याने त्यांनी तरुणाला थांबण्याचा इशारा केला. मात्र ताे न थांबता त्याने असवले यांना धडक देत फरफटत नेले. वाहतूक वॉर्डन विजाज रियाज सुलेमान यांनी त्याला पुढे जाऊन अडवले. अन्य दोन पोलीस अंमलदार तेथे आले. त्यांनी चालकास ताब्यात घेत चौकशी केली. चाैकशीत त्याचे नाव शारजील जाकीर अली खान (२३) असून, तो नागपाडा येथील रहिवासी असल्याचे समजले.                      त्याच्याकडे परवान्याबाबत विचारणा करीत असतानाच तेथे धडकलेल्या दुकलीने पोलिसांसोबत हुज्जत घातली आणि मोबाइलवर व्हिडिओ शूटिंग करू लागले. 

चालकासह साथीदारांना घेतले ताब्यातपाेलीस समजावत असताना एक जण पोलीस शिपाई सुनील बोरसे यांच्या अंगावर धावून गेला. दमदाटी केली. नियंत्रण कक्षात कॉल करून पोलिसांनी मदत मागितली. आझाद मैदान पोलिसांनी तेथे येऊन चालक शारजील, मोहम्मद कैफ खान (२१),  फैजल अब्दुल रहीम शेखवर (२३) गुन्हा नोंद केला. असवले यांच्या पायाला दुखापत झाली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस