शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कारचालक डॉक्टरने ठाण्यात दोघांना उडविले, पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:41 IST

Thane : हनी हा भरधाव वेगाने एका ऑडी मोटारकारने येत असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कापूरबावडी उपविभागाच्या पथकाला शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मिळाली.

ठाणे : अलीकडेच रशिया येथून आलेल्या वाघबीळ येथील हनी प्रदीप पाटील (२६) या क्ष-किरण तज्ज्ञाने (रेडिओलॉजिस्ट) कापूरबावडी ते कोपरी त्यानंतर सिडको बसथांबा या मार्गावर बेदरकारपणे भावाची मोटारकार चालवून दोघांना जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी त्याला नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले.हनी हा भरधाव वेगाने एका ऑडी मोटारकारने येत असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कापूरबावडी उपविभागाच्या पथकाला शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मिळाली. माजीवडा येथे नाकाबंदीदरम्यान त्याची कार अडविण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाने बॅरिकेड्स लावून सापळाही लावला. परंतु, त्यांना धुडकावून त्याने नितीन कंपनी आणि कोपरीमार्गे पळ काढून सिडको या ठिकाणी एका अपंगासह दोघांना उडविले. भन्नाट वेगाने आलेल्या हनी याला सिडको बसथांब्याजवळ काही स्थानिक नागरिकांनी अडवून चांगला चोपही दिला. त्यानंतर त्याला ठाणेनगर पोलिसांच्या हवाली केले. त्याच्या वाहन चालविण्यावरून तो मद्यपी असल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, त्याने मद्यप्राशन केले नसल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये आढळल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले. त्याच्या कारच्या धडकेने जाधव हे दुचाकीस्वार जखमी झाले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय, अन्य किरकोळ जखमींपैकी कोणीही तक्रार केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले. रेडिओलॉजिस्ट असलेला हनी अलीकडेच रशियातून ठाण्यात आला आहे. त्याने अशा प्रकारे बेदरकारपणे कार का चालविली, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे. त्यामुळे संबंधित डाॅक्टरचा सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.

वाहतूक पोलिसांमुळे टळला मोठा अनर्थमाजीवडा येथून निघाल्यानंतर वागळे इस्टेट वाहतूक पोलिसांनी कोपरी ब्रिज तसेच नितीन कंपनी येथील उड्डाणपूल बंद केला. त्यामुळे त्याने गुरुद्वारामार्गे कोपरीत शिरकाव केला. जर हे मार्ग अडविले नसते तर पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईत शिरकाव करून त्याने आणखी मोठे अपघात केले असते, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

टॅग्स :Accidentअपघात