शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

डीआरडीओचा संचालक अडकला ‘हनीट्रॅप’मध्ये; एटीएसने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 10:45 IST

पाकिस्तानला महत्त्वाची माहिती दिल्याचा संशय

पुणे - देशासंदर्भातील संवेदनशील माहिती आणि गुपिते पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डी.आर.डी.ओ.) संचालकाला अटक केली. तपासात त्याने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या हस्तकाशी संपर्क साधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रदीप कुरूलकर, असे अटक करण्यात आलेल्या शास्त्रज्ञाचे नाव आहे. 

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी पुणे येथील डी.आर.डी.ओ.च्या शास्त्रज्ञ कार्यालयामध्ये शासकीय कर्तव्यावर असताना, कुरूलकर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह हस्तकाच्या संपर्कात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. कुरूलकरने पदाचा गैरवापर करून त्याच्या ताब्यात असलेली देशासंदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा ठपका ठेवून, त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पुणे एटीएसने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर मुंबई येथील काळा चौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शास्त्रज्ञाने नेमकी कोणती गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली याचा तपास एटीएसकडून सध्या सुरू आहे.

निवृत्तीला सहा महिने होते शिल्लकडीआरडीओ’चा संचालक प्रदीप कुरूलकर हा हनीट्रॅपमध्ये अडकल्याने त्याने संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय एटीएसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअप व्हॉइस मेसेज, व्हिडीओ कॉलद्वारे तो पाकिस्तानी हस्तकाच्या संपर्कात होता.निवृत्तीला सहा महिने राहिलेले असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मोबाइलच्या माध्यमातून तो पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेसोबत संवाद साधत असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.

टॅग्स :DRDOडीआरडीओhoneytrapहनीट्रॅप