शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन भारतात घुसला; 56 इंची छातीचा देशाला काय उपयोग? खरगेंचा पीएम मोदींवर निशाणा
2
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
3
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
4
सोनिया गांधी नागरिकत्व घेण्याआधीच कशा बनल्या मतदार? १९८० च्या मतदार यादीवरून कोर्टाने बजावली नोटिस
5
"बच्चे बड़े हो जाते हैं, लेकिन…" IPL वर वसीम अक्रमची तिखट टिप्पणी; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
6
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
7
‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा
8
प्रदूषणामुळे वाढतोय सायलेंट स्ट्रोकचा धोका? लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, निष्काळजीपणा ठरेल घातक
9
तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती
10
Travel : भारतातील 'या' हिल स्टेशनला जाल तर इटलीचं सौंदर्य विसराल; महाराष्ट्राच्या तर आहे अगदीच जवळ!
11
हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!
12
ती व्हायरल ब्लू साडी गिरीजा ओकची नव्हतीच, तर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची!
13
Pune Crime: 'चल तुला शाळेत सोडतो', पुण्यात तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
14
TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत
15
ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट
16
Nagpur: तुला नोकरी मिळवून देतो, आधी माझ्याशी...; विश्वास टाकून फसली अन् महिला कबड्डीपटूला आयुष्याला मुकली
17
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
18
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा
20
डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे?
Daily Top 2Weekly Top 5

डाॅ. शीतल आमटेंच्या मृत्यूस कारणीभूत औषध जप्त; गोळ्या आणि इंजेक्शनही आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 08:06 IST

विसेरातील नमुन्यांसोबत तपासणी करणार

राजेश भोजेकरचंद्रपूर : डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूस कारणीभूत औषधीसह न वापरलेले इंजेक्शन व गोळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहे.  जप्त केलेले औषध व डाॅ. शीतल यांच्या विसेरातील नमुने जुळतात वा नाही हे तपासण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठविले आहे. डाॅ. शीतल यांची आत्महत्याच असावी, या निष्कर्षापर्यंत तपास पोहचला असला तरी यासाठी अहवालाकडे पोलिसांचे लक्ष लागून आहे, अशी माहिती विश्वसनीय पोलीस सूत्राने ‘लोकमत’ला दिली.

या शिवाय पोलिसांना काही महत्त्वपूर्ण धागेदोरे गवसले आहेत. त्याची पडताळणी केल्यानंतर पोलीस डाॅ. शीतल मृत्यूबाबत खुलासा करतील, असे  पोलीस सूत्राचे म्हणणे आहे. बुधवारी पोलिसांनी डाॅ. शीतल यांच्या मृत्यूदरम्यान तिच्या संपर्कात आलेले पती गौतम करजगी, सासू सुहासिनी करजगी व सासरे शिरीष करजगी यांच्यासह दोन नोकरांचे जबाब नोंदवले आहेत. यातून पोलिसांनी एकूणच घटनाक्रम समजून घेतला आहे. चौकशी दरम्यान पोलिसांना डाॅ. शीतल यांच्या खोलीत एक औषध आढळले. हे औषध गुंगीचे असावे, अशी शक्यताही पोलीस सूत्राने वर्तविली आहे. हे औषध डाॅ. शीतलच्या विसेराच्या नमुन्याशी जुळते का, किती मात्रा शरीरात गेल्यास मृत्यू होऊ शकतो, किती वेळात मृत्यू होतो. याचाही शोध पोलीस घेत आहे. सुमारे २५ ते ३० गोळ्याही आढळल्या आहेत.

आनंदवनचा निर्णय करण्याची ही वेळ नाही - पल्लवी आमटेजे घडले ते फार दुर्दैवी आहे. आमटे कुटुंबीयांना यातून सावरायला वेळ लागेल. शीतल अतिशय बुद्धिमान व गुणवत्तादायी होती. तिने जे काही स्वप्न पाहिले. तिची पुढील दिशा जी काही होती. ते पूर्ण करण्यासाठी आमटे कुटुंबीय कटिबद्ध आहेत. डाॅ. शीतलच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर सत्य पुढे येईलच. डाॅ. शीतलच्या मृत्यूने आमटे परिवाराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यातून सावरायला वेळ लागेल. आजवर समाजाने आनंदवनला जे सहकार्य केले. तसेच सहकार्य यापुढेही मिळतील.  - पल्लवी आमटे

मोबाइलमध्ये सुसाईड नोट असण्याची शक्यताडाॅ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली असेल तर त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असती. परंतु आतापर्यंतच्या तपासात ती कुठेही आढळली नाही. जप्त केलेल्या मोबाईल, टॅब वा लॅपटाॅपमध्ये सुसाईड नोट असण्याची दाट शक्यता आहे. यातूनच उलगडा होईल. 

डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूबाबतचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. आत्महत्या असावी, असे एकूणच तपासावरून दिसून येत आहे. परंतु फाॅरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ते स्पष्ट होईल. - अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर.

टॅग्स :Dr Sheetal Amteडॉ शीतल आमटेPoliceपोलिस