शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

विवाहितांभोवती हुंड्याचा फास, चार महिन्यांत २१८ गुन्हे, १० जणींचा बळी, उच्चशिक्षितांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 10:58 IST

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार महिन्यांत मुंबईत महिलांसंबंधित १ हजार ९९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ग्रामीण भागाप्रमाणे मुंबईतही विवाहितांभोवती हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ वाढत असून गेल्या चार महिन्यांत मुंबई पोलिसांच्या दफ्तरी २१८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ८६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. दिवसाला एक ते दोन महिला हुंड्यासह कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार ठरत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत चार महिन्यांतील आकडेवारी कमी असली तरी अत्याचाराचा सूर पूर्णपणे थांबलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे. 

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार महिन्यांत मुंबईत महिलांसंबंधित १ हजार ९९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी १,४७० गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये ३२५ जणी विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. तर, ४०७ जणींच्या अपहरणाची नोंद झाली आहे. कोरोनाच्या काळात अनेकांच्या जीवनशैलीत बदल झाले. चार भिंतीआड कैद झाल्यामुळे कुठे नाती एकत्र आली तर कुठे वादाच्या घटना वाढल्या. हुंड्यासाठीही महिलांचा मानसिक, शारीरिक छळ सुरू असून गेल्या चार महिन्यांत २१८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

 कांदिवलीत हुंडाबळी  कांदिवलीत राहणाऱ्या ममता अशोककुमार चौरसियांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये ममताचा विवाह झाला. विवाहाच्या काही दिवसांनंतर हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. वेळोवेळी मारहाण केली.  १५ फेब्रुवारी रोजी ममताचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी ममताचा भाऊ  जितेंद्र सीयाराम चौरसिया (३६) यांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवत पतीसह सासऱ्याला अटक केली आहे.

पोलिसांकडून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न कुटुंबातील वाद पोलिसांपर्यंत आल्यानंतर थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी महिला अधिकारी व कर्मचारी सुरुवातीला त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घेऊन पुढील कार्यवाही करतात. महिला कक्षाकडून अनेक प्रकरणांत समेट घडवून संसार जोडण्याचे काम या माध्यमातून करण्यात येते. पोलिस उपायुक्त (महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा) हे महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेचे प्रभारी असून, त्यांच्या अंतर्गत कक्ष १, कक्ष २ आणि महिला सहाय कक्ष यांचा समावेश होतो. कक्ष २ हा हुंडाबळी, हुंड्याच्या संबंधित आत्महत्या आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत उद्धवणारे इतर गुन्हे, भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ (अ) अंतर्गतचे गुन्हे तसेच कौटुंबिक हिंसाचार व हुंड्याशी निगडित इतर गुन्ह्यांचा तपास, तसेच याबाबत प्राप्त तक्रार अर्जांची चौकशी आणि निपटारा करण्याचे काम करतात.

७ जणींची हत्या, ९ जणींची आत्महत्या  ७ जणींची हुंड्याव्यतिरिक्त विविध कारणांतून हत्या करण्यात आली.   तर ९ जणींनी अन्य तणावातून टोकाचे पाऊल उचलले आहे.   याप्रकरणी मुंबई पोलिसांनी हत्येच्या सातही गुन्ह्यांत आरोपीवर कारवाई केली. तर, आत्महत्येप्रकरणी सहा प्रकरणांचा छडा लावण्यात यश आले.

हुंड्याव्यतिरिक्त होत असलेल्या छळाप्रकरणी ६८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हुंड्यासाठी चौघींचा बळी घेण्यात आला, तर ६ जणींनी आयुष्य संपविले. गेल्यावर्षी याच चार महिन्यांत २९५ गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

टॅग्स :dowryहुंडा