शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खरप येथील दुहेरी हत्याकांड; सात आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 10:55 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या हत्याकांडातील सात आरोपींना मंगळवारी अटक केली.

अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या खरप येथे वेल्डिंग वर्कशॉपचा व्यवसाय करणाऱ्या बाप- लेकाची याच परिसरातील रहिवासी सात आरोपींनी निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या हत्याकांडातील सात आरोपींना मंगळवारी अटक केली. या सातही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. विजय क्षीरसागर तसेच सनातन क्षीरसागर अशी मृतकांची नावे असून, जागेचा वाद तसेच पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे.खरप येथील रहिवासी तसेच वेल्डिंगचा व्यवसाय करणारे विजय क्षीरसागर आणि सनातन क्षीरसागर याच परिसरातील एका चौकात सोमवारी रात्री उभे असताना त्यांच्यावर खरप येथील रहिवासी छोट्या उर्फ धम्मपाल नागसेन इंगळे, जयसेन नागसेन इंगळे, आकाश बिंबिसर इंगळे, आदेश देवानंद इंगळे, सतीश देवानंद इंगळे, जयपाल उर्फ लखन इंगळे, निल इंगळे या सात आरोपींनी लोखंडी पाइप, काठ्या तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हे हत्याकांड घडल्यानंतर परिसरात शांतता असल्याने या दोघांचेही मृतदेह बराच वेळ रस्त्यावर पडून होते. स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांना हत्याकांडाची माहिती मिळाली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला तसेच विजय क्षीरसागर आणि सनातन क्षीरसागर यांचे मृतदेह ताब्यात घेऊन तातडीने उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. त्यानंतर या हत्याकांडाचा तपास करतानाच सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. या आरोपींकडून स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या पथकाने पाइप तसेच काही शस्त्र जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे हत्याकांड पूर्ववैमनस्यातून घडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा सदर सात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.स्थानिक गुन्हे शाखेने केले आरोपी अटकखरब येथे पूर्ववैमनस्यातून बापलेकाचे दुहेरी हत्याकांड झाल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन सोमवार आणि मंगळवारी हत्याकांडातील सात आरोपींना अटक केली. या आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी