शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लातुरातील साई मंदिरातील दानपेटी फाेडली, अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 12:42 IST

Crime News: लातूर शहरातील विशाल नगरात असलेल्या साई मंदिरातील दानपेटी अज्ञात चाेरट्यांनी फाेडल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. चाेरट्यांनी जवळपास २५ ते ३० हजारांची राेकड पळविली आहे.

लातूर : शहरातील विशाल नगरात असलेल्या साई मंदिरातील दानपेटी अज्ञात चाेरट्यांनी फाेडल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. चाेरट्यांनी जवळपास २५ ते ३० हजारांची राेकड पळविली आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी नानासाहेब दिगंबरराव पाटील (५४ रा. जुना औसा राेड, संगमेश्वर साेसायटी, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. लातुरातील विशाल नगरात असलेल्या साई मंदिराच्या मुख्य लाकडी दरवाज्याचा कडीकाेंडा ताेडून अज्ञात चाेरट्यांनी आत प्रवेश केला. मंदिरातील साई मूर्ती समाेर असलेल्या स्टीलच्या दाेन दानपेट्या लाेखंडी सळईने उचकटून त्यातील भक्तांनी दान केलेली रक्कम जवळपास २५ ते ३० हजार रुपये चाेरट्यांनी पळविले. दरम्यान, घटनास्थळी एमआयडीसी पाेलिसांनी भेट देवून पंचनामा केला. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरुन अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस हवालदार देशमुख करीत आहेत.वाॅचमनची नजर चुकवत डल्लामंदिर समितीच्यावतीने सुरक्षेसाठी वाॅचमन नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, ताे आतल्या खाेलीत झाेपल्याची माहिती पाेलिसांनी दिली. वाॅचमनच्या हालचालींवर नजर ठेवत, त्यांची नजर चुकवत चाेरट्यांनी दाेन्ही दानपेट्यांवर डल्ला मारला आहे. चाेरट्यांनी दानपेट्यातील केवळ नाेटाच लंपास केल्या आहेत. तर नाण्यांना मात्र त्यांनी हात लावला नाही. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे.  

मंदिर परिसरात लावलेले सीसीटीव्ही रात्री निष्क्रिय- लातूर शहरातील विशाल नगरात असलेल्या साई मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये रात्रीच्या घडमाेडी, हालचाली स्पष्ट दिसून येत नसल्याने, चाेरट्यांनी मंदिरातील दाेनही दानपेट्या फाेडण्याचे धाडस केले आहे. - काेराेनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर नियम शिथिल करण्यात आले हाेते. परिणामी, मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेत हाेती. - मंदिर दर्शनासाठी खुले झाले तरी दानपेट्या उघडण्यात आल्या नव्हत्या.-  नेमकी कितीची राेकड चाेरट्यांनी पळविले, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. 

श्वान, फिंगर प्रिंट पथकाकडून पाहणी- घटनास्थळी श्वान पथक, फिंगर प्रिंट पथकाने भेट देत पाहणी केली आहे. - चाेरट्यांच्या शाेधासाठी पथके काम करत आहेत. पहाटे २ ते ५ दरम्यान, चाेरट्यांनी मंदिरातील दानपेट्या फाेडल्या आाहेत. एमआयडीसी पाेलिसांची व्हॅन १ ते २ वाजण्याच्या सुमारास गस्तीवर हाेती. पाेलीस आणि वाॅचमनची नजर चुकवत चाेरट्यांनी ही चाेरी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी