शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

२४ कोटींचा चेक, बँक मॅनेजर अन् लुबाडणारी टोळी; डोंबिवली पोलिसांनी ८ जणांना पकडलं, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 16:40 IST

इंडोस मोबाईल टॉवर कंपनीने २४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याचाच हा चेक आहे असं बँक मॅनेजरला सांगितले.

कल्याण-एका बड्या मोबाईल टॉवर कंपनीचा २४ कोटीचा चेक बँकेत वटविण्यासाठी एक जण आला. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने बँक मॅनेजरने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता देशभरात दहा कोटीचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. 

१ ऑक्टोबर २०२१ रोजी डोंबिवलीतील एचडीएफसी बँकेत हरीचंद्र कडवे हे २४ कोटींचा चेक घेऊन आले. वांगणीच्या संत रोहिदास सेवा संस्थेचे ते अध्यक्ष आहेत असे सांगून संस्थेला इंडोस मोबाईल टॉवर कंपनीने २४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्याचाच हा चेक आहे. बँकच्या क्लार्कला संशय आला. त्याने मॅनेजर विशाल व्यास याला सांगितले. त्यांनी कडवेला सीसीटीव्हीत पाहिले. त्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी कडवेसह अन्य दोन जणांना अटक केले. तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला. 

हरीचंद्रला २४ कोटीचा चेक मजहरने दिला होता. मजहरला हा चेक अनेक ओतारी याने दिला होता. अनेकला हा चेक फारूक उमरने दिला होता. फारुकला हा चेक सचिन साळसकर याने दिला होता अशी माहिती समोर येत असताना प्रत्येक जण दुसऱ्याचे नाव सांगत होते. मात्र साळसकरला हा चेक तयार करण्यास भावेश ढोलकिया याने सांगितले होते. भावेशला सचिन काही महिन्यापूर्वीच भेटला होता. सचिन हा कॉम्प्युटर मॅकेनिक आहे. तो कोणत्याही कंपनीचा बनावटी चेक छोलकिया याच्या सांगण्यावरुन तयार करीत होता. भावेश हा अशाच एका प्रकरणात गुजरातच्या जेलमध्ये होता. या टोळीने आत्तार्पयत देशभरात १० कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.  

या प्रकरणात आत्तार्पयत हरीशचंद्र कडवे, नितीन दिलीप शेलार, अशोक बिहरीराम चौधरी, मजहर मोहम्मद हुसेन खान, उमर फारुक , सचिन साळसकर, अनेक अनिल ओतारी, भावेश लक्ष्मणभाई ढोलकिया  या आठ जणांना अटक केली आहे. या टोळीचा म्होरक्या भावेश आहे. या टोळीने आणखीन किती जणांना गंडा घातला आहे याचा तपास सुरु असल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जे. डी. मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीbankबँक