शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोफा सेटमधील 'त्या' मृतदेहाचं गूढ उकललं; अतिप्रसंगाला विरोध केल्यानं तरुणानं महिलेला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 14:48 IST

टायने गळा आवळून केली हत्या; चपलेच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

डोंबिवली दावडी परिसरात एका इमारती मध्ये सुप्रिया शिंदे या  महिलेचा मृतदेह घरातील सोफा सेटमध्ये आढळला होता. सुप्रिया हिची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. मात्र काहीच सुगावा नसल्याने आरोपी शोधण्याचं आवाहन पोलिसांसमोर उभं ठाकले होते. तपासा दरम्यान साक्षीदारांनी हत्या झाली. त्या वेळेत सुप्रिया यांच्या घराबाहेर चपला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी ही चप्पल कुणाची हे शोधून काढत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. विशाल घावट असं या आरोपीचे नाव असून विशाल हा शिंदे यांचा शेजारी आहे. पुस्तक देण्याच्या बहाण्याने तो घरात शिरला. सुप्रियावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला सुप्रियाने प्रतिकार केला. याच प्रतिकार दरम्यान विशालने तिची निर्घृण हत्या केली. 

डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी इमारतीमध्ये कीशोर शिंदे त्यांची पत्नी सुप्रिया शिंदे आपल्या मुलासह  राहत होते. 15 फेब्रुवारी रोजी  किशोर शिंदे सकाळी कामावर गेले सायंकाळी घरी परतले तेव्हा त्यांची पत्नी सुप्रिया घरी नव्हती. त्यांनी तिचा शोध घेतला नातेवाईकांकडे विचारपूस केली मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर रात्रीच्या सुमारास किशोर हे पत्नी हरविल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्यात गेले याच दरम्यान घरी असलेल्या नातेवाईकांना सुप्रिया यांचा मृतदेह घरातील सोफा सेटमध्ये आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.सुप्रिया हिचा गळा आवळून  हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र कोणताही सुगावा नसल्याने हत्या का व कुणी केली, आरोपीला शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकलं होतं.  तपासादरम्यान काही साक्षीदारांनी घराच्या बाहेर काही चपला आढळल्याचा पोलिसांना सांगितलं. हाच धागा पकडून पोलिसांनी त्या चपला कुणाच्या याचा शोध सुरू केला. विविध चपलांचे फोटो साक्षीदारांना दाखवत चपल कोणती हे निष्पन्न केलं. अखेर शिंदे यांच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशाल गावडे याची चप्पल असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली.15 फेब्रुवारी  रोजी त्यावेळी दुपारी सुप्रिया यांचा मुलगा शाळेत गेला होता व पती कामावर निघून गेले होते. सुप्रियाला वाचनाची आवड असल्याने  विशाल पुस्तक देण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. सुप्रिया घरी एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सुप्रियाने त्याला प्रतिकार केला. यावेळी विशालने सुप्रियाचे डोके फरशीवर आपटलं. त्यानंतर टायने गळा आवळून तिला ठार मारले व तिचा मृतदेह त्याच्या घरातील सोफासेट मध्ये लपवून ठेवला. धक्कादायक म्हणजे सुप्रिया घरी नसल्याने किशोर हे मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले. त्या वेळेला विशाल हा देखील त्यांच्यासोबत गेला होता. पोलिसांनी या प्रकरणात काहीही सुगावा नसताना फक्त चपले वरून आरोपी शोधण्यात मानपाडा पोलिसांना यश आले. या इमारतीतील व आजूबाजूच्या कोणत्याही इमारतीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही बसवण्याचा देखील आवाहन केलं.