शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा डॉक्टर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 06:34 IST

पूर्वेतील एका क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या सतरावर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. क्लि

 कल्याण : पूर्वेतील एका क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या सतरावर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. क्लिनिकच्या बाजूला असलेल्या औषध दुकानदाराने या दुष्कृत्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानेही मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मंगळवारी रात्री डॉक्टर ताज अन्सारीला अटककेली असून, दुकानदार दिलदार शेखचा शोध सुरू आहे.पूर्वेतील सूचकनाका परिसरात डॉक्टर ताज अन्सारी याच्या हसन क्लिनिकमध्ये पीडित मुलगी कामाला आहे. मार्च महिन्यापासून डॉक्टर अन्सारी पीडित मुलीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होता. मुलीची घरची परिस्थिती बेताची आहे. डॉक्टरला विरोध केल्यास तो कामावरून काढून टाकेल, या भीतीने ती या प्रकाराकडे दुर्लक्ष करत होती. एक दिवस क्लिनिकमध्ये कोणी नसताना डॉक्टरने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितला, तर बदनामी करण्याची आणि कामावरून काढून टाकण्याची धमकी त्याने पीडित मुलीला दिली.पीडित मुलगी निमूटपणे अत्याचार सहन करत असल्याने डॉक्टरची हिंमत वाढली. क्लिनिकमध्ये कोणी नसताना तो अधूनमधून तिच्यावर अत्याचार करत होता. क्लिनिकच्या बाजूलाच दिलदार शेख याचे औषधांचे दुकान आहे. त्याला या प्रकाराची कुणकुण लागली होती. एक दिवस डॉक्टर आणि पीडित मुलीचा व्हिडीओ दिलदार शेखने काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शेखने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करत तिचा विनयभंग केला. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल करून डॉक्टर अन्सारीला रात्री अटक केली. आरोपी दिलदार शेखचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी