शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

डॉक्टर मुलाकडे आईसह भावाने केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 01:21 IST

भाईंदरच्या उत्तन येथील डॉक्टर मुलाच्या रुग्णालयातील ५० हजार रुपयांची रोकड आई आणि भावाने चोरुन नेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भाईंदर  - भाईंदरच्या उत्तन येथील डॉक्टर मुलाच्या रुग्णालयातील ५० हजार रुपयांची रोकड आई आणि भावाने चोरुन नेल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सुरज सभापती यादव (३०) हे डॉक्टर असून उत्तनच्या बाप्टीस्टा इमारतीत फोनसेकर यांच्या तीसऱ्या मजल्यावरील सदनिकेत भाड्याने एकटे राहतात. त्यांचे ठाण्याच्या गावदेवी मंदिराजवळील रोज एडल इमारतीत विघ्नहर क्रिटीकल केअर नावाने रुग्णालय आहे. सुरजची आई उर्मिला (५०) व मोठा भाऊ सचीन (३२) रा. राणावत हाईट्स, रामदेव पार्क, मीरारोड येथे राहतात.१० तारखेला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा पगार केला जात असल्याने, सुरज यांनी बुधवारीच ५० हजार रुपये रुग्णालयातील दालनातल्या खणात ठेवले होते. दरम्यान, त्यावेळी दालनात आलेली आई मालमत्तेवरुन त्यांच्याशी भांडत होती. त्याकडे लक्ष न देता सुरज रुग्णाला पाहण्यासाठी निघून गेले. त्यांचा भाऊ सचीनसुध्दा दालनात आला. ते दोघे बसले असताना कर्मचारी येत जात होते. सायंकाळच्या सुमारास सुरजने खण पाहिला असता, त्यातून ५० हजार चोरीला गेले. याप्रकरणी गुरूवारी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर सुरजची आई उर्मिला, भाऊ सचीन व अनोळखी व्यक्तीविरोधात ५० हजार रुपये चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ठाणे पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.नेहमीच करतात शिवीगाळतक्रारदार डॉक्टरची आई आणि भाऊ काही कामधंदा करत नाहीत. त्यांचा सर्व खर्च सुरज करतात. पण मालमत्तेच्या वादातून रुग्णालयात जाऊन तोडफोड, शिवीगाळ करणे आदी प्रकार आई व भावाने केले असले, तरी सुरज यांनी त्याबाबत तक्रार केली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे