शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी बलात्कार पीडितेच्या घरी गेलेल्या डॉक्टरला तालिबानी शिक्षा; फरफटत नेले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:58 IST

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी पोहचले.

गया - बिहारच्या गया जिल्ह्यात एक हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी काही दबंग गुंडांनी एका डॉक्टरला झाडाला बांधून बेदम मारलं आहे. हे डॉक्टर एका बलात्कार पीडितेच्या घरी उपचार करण्यासाठी गेले होते. पीडितेच्या कुटुंबावर बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी हे गुंड दबाव टाकत होते. त्यात पीडितेच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे डॉक्टर जितेंद्र यादव यांना घरी बोलावण्यात आले. तेव्हा गावातील १०-१२ गुंडांनी डॉक्टरांना पकडले. त्यानंतर त्यांना फरफटत नेत झाडाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा काही गावकऱ्यांनी लपून व्हिडिओ बनवला तेव्हा ही घटना उघडकीस आली.

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी पोहचले. तिथे रक्तबंबाळ झालेल्या डॉक्टरांना रस्सीतून सुटका केली. त्यानंतर डॉक्टरांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. माहितीनुसार, बलात्कारातील आरोपी पीडितेच्या कुटुंबाला खटला मागे घेण्यासाठी धमकी देत होते. त्याचवेळी पीडितेची आई आजारी पडली. आईच्या उपचारासाठी डॉ. जितेंद्र यादव यांना घरी बोलवण्यात आले. त्यावेळी संतापलेल्या गुंडांनी मिळून डॉक्टरला फरफटत नेले आणि झाडाला रस्सीने बांधले. या गावगुंडांची दहशत इतकी आहे की कुणीही उघडपणे त्यांना विरोध करण्याची हिंमत केली नाही. काही लोकांनी घाबरून लपत लपत हा व्हिडिओ बनवला. 

या व्हायरल व्हिडिओत डॉक्टर जितेंद्र यादव यांना झाडाला बांधून मारहाण करताना स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत. बिहारमधील या घटनेने विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केलेत. त्यात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या घटनेची तुलना तालिबानी कृत्याशी केली आहे. तेजस्वी यांनी व्हिडिओ शेअर करत हे तेच डॉक्टर आहेत, जे रेप पीडितेच्या आईवर उपचार करायला गेले होते तेव्हा गुंडांनी त्यांना मारहाण केली असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, बिहारमध्ये तालिबानपेक्षा भयंकर परिस्थिती आहे. गया जिल्ह्यात बलात्कार पीडितेच्या आईवर उपचार करण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला आरोपींनी झाडाला बांधून इतके मारले की ते रक्तबंबाळ झाले. २० वर्षाच्या भष्ट एनडीए सरकारमध्ये पोलीस आणि प्रशासन गुन्हे रोखण्यास, गुन्हेगारांना आळा घालण्यात आणि न्याय मिळवून देण्यात असक्षम आहेत. ज्याची जिथे मर्जी तिथे कायदा लोक हातात घेत आहेत. बिहारमध्ये अराजक स्थिती आहे. मुख्यमंत्री बेशुद्ध आहेत, सरकार नशेत आहे. अधिकारी, मंत्री खजिना लुटण्यात व्यस्त आहे असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी