शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:42 IST

आरोपींनी वॉर्डातील औषधे आणि इतर उपकरणांचीही तोडफोड करुन रुग्णालयात गोंधळ घातला.

Doctor Trashed in Gujarat Hospital : गुजरातच्या भावनगरमधील एका खासगी रुग्णालयात तीन तरुणांनी डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रुममध्ये जाण्यापूर्वी डॉक्टरांनी तरुणांना चप्पल बाहेर काढण्यास सांगितले, यावर आरोपी संतापले आणि त्यांनी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण ?पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 12 सप्टेंबर रोजी भावनगरच्या सिहोर शहरातील श्रेया हॉस्पिटलमध्ये घडली. तीन आरोपी तरुण रुग्णालयात दाखल असलेल्या जखमी महिलेला भेटण्यासाठी आले होते. तिघेही रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात चप्पल घालून गेले. यावर डॉक्टर जयदीप सिंग गोहिल (वय 33) यांनी त्यांना चप्पल बाहेर काढण्यास सांगितली. याचा राग येऊन तरुणांनी डॉक्टरांना शिवीगाळ आणि बेदम मारहाण केली. या घटनेत डॉक्टर गंभीररित्या जखमी झाले आहेत. 

आरोपींनी वॉर्डातील औषधे आणि इतर उपकरणांचीही तोडफोड करुन रुग्णालयात गोंधळ घातला. ही संपूर्ण घटना वॉर्डमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी पोलिसांनी दाखल करण्यात केलेल्या एफआयआरमध्ये आरोपींनी डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी हिरेन डांगर, भावदीप डांगर आणि कौशिक कुवाडिया या तिघांविरोधात भादवी कलम 115 (2) (कोणत्याही व्यक्तीला दुखापत करण्याच्या हेतूने कृत्ये), 352 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर कृत्य), 351 (3) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल