शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मूळव्याधावर निष्काळजीपणे शस्त्रक्रिया करणाऱ्या डाॅक्टरला अटक; माटुंगा पाेलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 13:25 IST

टॅक्सीचालकाच्या तक्रारीनंतर माटुंगा पाेलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : एमबीबीएस डाॅक्टरला मूळव्याधावर शस्त्रक्रिया करण्याची कायदेशीर परवानगी नसतानाही एक डाॅक्टर ६ ते ७ वर्षांपासून मूळव्याधावर शस्त्रक्रिया करत हाेता. गोरेगावातील  टॅक्सीचालकाला त्याच्या चुकीच्या उपचारांमुळे नाहक त्रास झाला. त्याच्या तक्रारीवरून गोपाळराव क्लिनिकच्या डॉक्टर एस. मुकेश कोटाला माटुंगा पोलिसांनी अटक केली. 

गोरेगाव परिसरात राहणारे ४३ वर्षीय तक्रारदार टॅक्सीचालकाला गेल्या ३ वर्षांपासून मूळव्याधीचा त्रास होता. त्यांच्या सहकारी चालकांनी दादर टी. टी. सर्कल येथेे असलेल्या गोपाळराव क्लिनिकबाबत त्यांना सांगितले. त्यांनी फेब्रुवारीत तेथील डॉ. एस. मुकेश कोटा यांची भेट घेत  उपचार सुरू केले.

२१ फेब्रुवारीला कोटाने २५ हजार घेऊन शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर चार तासांनी त्यांना घरी पाठवेले. ते पत्नीसह टॅक्सीने घरी जात असतानाच त्यांना रक्तस्राव होऊ लागला. चक्कर येऊन कोसळल्याने केईएम रुग्णालयात  त्यांना करण्यात आले. तेथे डाॅ. कोटाने चुकीच्या पद्धतीने निष्काळजीपणाने उपचार केल्याचे समाेर आले. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर २५ मार्च रोजी त्यांनी माटुंगा पोलिसांत तक्रार दिली. शस्त्रक्रियेमुळे त्यांच्यावर डायपर घालण्याची वेळ ओढावली. वाहन चालविणे शक्य नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झाला. 

माटुंगा पोलिसांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, जे. जे. रुग्णालयाकडे याबाबत विचारणा केली. यासाठी जे.जे. रुग्णालयात २१ जून राेजी तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली. माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बोबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहवालात एमबीबीएस डॉक्टर मूळव्याधावर शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. त्यासाठी एम.एस. सर्जरी ही अतिरिक्त शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. तसेच उपचार करताना कोटाने निष्काळजीपणा, हलगर्जीपणा केल्याचे यत नमूद आहे. त्यानुसार कोटाला अटक करण्यात आली.  दरम्यान, कोटा गेल्या ६ ते ७ वर्षांपासून मूळव्याधावर शस्त्रक्रिया करत आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया केलेल्या अन्य रुग्णांचे काय झाले, याबाबतही पोलीस तपास करत आहेत. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसArrestअटक