शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे पोलिसिंग करू नका, अन्यथा कारवाई; पोलीस आयुक्तांनी फेसबुक लाईव्हद्वारे साधला संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 08:20 IST

दर रविवारी तीन ते साडे तीनच्या सुमारास ते जनतेशी संवाद साधणार आहे. यादरम्यान नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एखाद्याचा मोबाइल चोरी झाला असल्यास चोरीची तक्रार घ्या. त्याला हरवल्याबाबत दाखवून चुकीचे पोलिसिंग करू नका, अन्यथा कारवाई करू असा  इशारा मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे केला आहे. तसेच, दर रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे ते नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे. 

आयुक्तांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा केली. यादरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नावर विशेष भर देताना दिसले. ‘बीट अधिकाऱ्याने त्याच्या बीटमधील सर्व ज्येष्ठ नागरिकांची यादी मिळवून, ती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना द्यावी. त्यापैकी बीट अधिकाऱ्याने जेष्ठ नागरिकांना नोटबुकचे वाटप करावे. बीट कॉन्स्टेबलने आठवड्यातून किमान दोनदा भेट देऊन त्या नोटबुकवर आपली स्वाक्षरी करावी. दर आठवड्याला बीट अधिकाऱ्याने भेट देऊन तपासणी करावी. 

बीट पोलीस निरीक्षक दर १५  दिवसांतून एकदा पर्यवेक्षण करेल आणि अधिकारी व अंमलदार यांनी भेट दिली आहे का त्याची तपासणी करेल अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहे. तसेच, महिनाअखेरीस वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सर्व बीटच्या डायरीची तपासणी करावी, बीट अधिकारी व अंमलदार गस्ती बाबत नोंद घ्यावी. तसेच काही समस्या असल्यास आमच्या निदर्शनास आणून द्यावी असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. 

दर रविवारी तीन ते साडे तीनच्या सुमारास ते जनतेशी संवाद साधणार आहे. यादरम्यान नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडीसारख्या विविध समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.  

शिवाय वाहतूक कोंडीच्या समस्येला त्यांनाही तोंड द्यावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे सायबर गुन्हेगारांपासूनही नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. प्रत्येक तक्रारीची योग्यरीत्या नोंद करत दखल घ्यावी. जनतेच्या मनात, येथे तक्रार केल्यास न्याय मिळेल असा विश्वास निर्माण होईल असे कार्य करा, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Policeपोलिस