शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात मोठा खुलासा; हॉटेल मालकासह 3 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 19:05 IST

Divya Pahuja Murder Case : दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात पोलीस कारवाई करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

गुरुग्राममधील दिव्या पाहुजा हत्या प्रकरणात पोलीस कारवाई करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने अभिजीत, प्रकाश आणि इंद्रज या मारेकर्‍यांना अटक करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गुन्हे शाखेने हॉटेलचा मालक अभिजीत सिंह यालाही अटक केली आहे. याशिवाय प्रकाश आणि इंद्रज यांना अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. प्रकाश आणि इंद्रज एका हॉटेलमध्ये काम करायचे. त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली होती.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली घटना 

मॉडेल दिव्या पाहुजा ही गुरुग्रामच्या बलदेव नगरची रहिवासी होती. हॉटेल मालक अभिजीत आणि त्याच्या साथीदारांनी दिव्याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने साथीदारांना 10 लाख रुपये दिले. यानंतर मारेकरी अभिजीतच्या दोन साथीदारांनी अभिजीतच्या निळ्या रंगाच्या BMW DD03K240 कारच्या डिकीमध्ये मृतदेह टाकून घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दिव्या पाहुजा ही गँगस्टर संदीप गाडोली एन्काउंटर प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. त्यामुळे तिच्या हत्येमागे गँगस्टर संदीप गाडोलीची बहीण सुदेश कटारिया आणि गँगस्टरचा भाऊ ब्रह्मप्रकाश यांचा हात असल्याचा आरोप दिव्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दिव्याच्या कुटुंबीयांनी सुदेश आणि ब्रह्मप्रकाश यांच्या विरोधात हत्येचा कट रचल्याची तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2 जानेवारी रोजी रात्री उशीरा सेक्टर 14 पोलीस स्टेशन परिसरात घडली, जिथे पोलिसांना माहिती मिळाली की दिव्या पाहुजा नावाची एक 27 वर्षीय तरुणी, बलदेव नगर, गुरुग्राम येथे राहणारी आहे. दिल्लीतील व्यापारी आणि सिटी पॉइंट हॉटेलचा मालक अभिजीतसोबत फिरण्यासाठी ती बाहेर गेली होती.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी