शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दृश्यम चित्रपटाच्या धर्तीवर लावली मृतदेहाची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:00 IST

अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या युवकाचा खून करून बाईकसह मृतदेह १० फूट खड्ड्यात पुरल्याची घटना अजय देवगन आणि तब्बू यांच्या दृश्यम चित्रपटाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवर्धा येथील रहिवासी पंकज गिरमकर खून प्रकरणआरोपींनी पोलिसांवर लावला मारहाणीचा आरोप

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या युवकाचा खून करून बाईकसह मृतदेह १० फूट खड्ड्यात पुरल्याची घटना अजय देवगन आणि तब्बू यांच्या दृश्यम चित्रपटाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. आरोपींना कोणतेच सुगावे सोडले नाहीत. तरीसुद्धा पोलिसांनी त्यांचा छडा लावला. परंतु प्रकरणाच्या तपासात बाधा उत्पन्न करण्यासाठी आरोपींनी सोमवारी न्यायालयात त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला. पोलीस रात्री उशिरापर्यंत आरोपींची वैद्यकीय तपासणी करीत होते.गुन्हे शाखा पोलिसांनी वर्धा येथील रहिवासी पंकज गिरमकर (३२) याच्या खुनाचा उलगडा महिनाभरानंतर करून सूत्रधार अमरसिंह उर्फ लल्लू ठाकुर, त्याचे साथीदार मनोज उर्फ मुन्ना तिवारी आणि शुभम उर्फ तुषार डोंगरेला अटक केली. अमरसिंहचे पंकजच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्याची माहिती कळताच पंकज नागपूर सोडून वर्ध्याला आपल्या गावी गेला. त्यानंतरही अमर पंकजच्या पत्नीच्या संपर्कात होता. २८ डिसेंबरला पंकज अमरसिंहला समजविण्यासाठी त्याच्या कापसी येथील धाब्यावर गेला. तेथे घणाने त्याच्या डोक्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला. खुनानंतर जेसीबीच्या साह्याने १० फुटांचा खड्डा करून पंकजचा मृतदेह बाईकसह त्यात पुरला. त्याने दृश्यम चित्रपटाप्रमाणे पंकजचा मोबाईल कापसीत उभ्या असलेल्या एका ट्रकमध्ये फेकून दिला. पंकज बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी धंतोली पोलिसात दिली. पोलिसांनी मोबाईलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ज्या ट्रकमध्ये मोबाईल फेकला तो राजस्थानला गेला होता. त्यामुळे मोबाईलचे लोकेशन राजस्थान असल्याचे समजले. त्यामुळे पंकज राजस्थानला गेल्याची शंका आली. दरम्यान, पोलिसांना पंकजचा खून झाल्याचे समजले. तो बेपत्ता झाल्यावरही पत्नीच्या स्वभावात बदल झाला नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी अमरच्या धाब्यावर पाळत ठेवणे सुरू केले. आठवडाभर निरीक्षण केल्यावर या खुनाचा उलगडा झाला. चौकशीत पोलिसांनी आरोपींना चित्रपटाच्या धर्तीवर योजना आखली काय, अशी विचारणा केली असता आरोपींनी त्याचा इन्कार केला. त्यांच्या मते धाब्यावरून मृतदेह दुसरीकडे नेणे शक्य नव्हते. त्यामुळे तेथेच मृतदेह पुरण्याचा निर्णय घेतला. अमरचा साथीदार शुभम कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला पोलीस मोबाईल लोकेशनवरून तपासाची दिशा ठरवित असल्याचे माहीत होते. त्यामुळे त्यांनी मोबाईल ट्रकमध्ये फेकला. त्यांना सीडीआर पाहून पोलीस दिशाहीन होतील हे माहीत होते. पोलिसांनी खड्डा खोदून रविवारी पंकजचा मृतदेह आणि दुचाकी बाहेर काढली. मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आला. वर्ध्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून