शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

विकृती ! आरोग्य उपकेंद्रात चोरी करून लिहिला अश्लिल मजकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 19:07 IST

फुटकळ चोरी करायला आला आणि अख्ख्या आरोग्य उपकेंद्रात जागा मिळेल त्या ठिकाणी अश्लिल मजकूर लिहिल्याचा प्रकार कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे आरोग्य उपकेंद्रात घडला.

नांदापूर, (हिंगोली) : फुटकळ चोरी करायला आला आणि अख्ख्या आरोग्य उपकेंद्रात जागा मिळेल त्या ठिकाणी अश्लिल मजकूर लिहिल्याचा प्रकार कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे आरोग्य उपकेंद्रात घडला. यामुळे महिला कर्मचाऱ्यांत असुरक्षिततेची भावना असून कळमनुरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

नांदापूर हे जि.प. सर्कलचे गाव. हिंगोलीपासून १५ ते २0 किमी अंतरावर आहे. पाच ते सहा हजार लोकसंख्या. या गावासाठी आरोग्य उपकेंद्र आहे. राजकीयदृष्ट्या प्रबळ असल्याने या उपकेंद्रात एक औषधनिर्माता, दोन परिचारिका अन् दोन सेविका आहेत. एक प्रतिनिुयक्तीवर इतरत्र आहे. शाळा व अंगणवाडीनजीकच दोन-तीन खोल्यांत या उपकेंद्राचा कारभार चालतो. येथून काही ग्रामस्थ पाणी नेत असल्याने मुख्य प्रवेशद्वार कुलूपबंद न करताच रात्री उपकेंद्र बंद करून कर्मचारी जातात. मुख्यालयी निवासाची व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांची ये-जा असते. यामुळे या उपकेंद्रात यापूर्वीही एक-दोनदा किरकोळ चोरी झाली. 

जागा दिसेल तिथे लिहिले गुरुवारी रात्रीही असाच प्रकार घडला. प्रतिरुग्ण २ रुपये याप्रमाणे जमा होणारे ओपीडीचे ४00 ते ५00 रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला. मात्र ही चोरी केल्यानंतर चोरट्यांनी आणखी एक उपद्व्याप करून ठेवला आहे. या ठिकाणी खिडक्या, दरवाजे,  भिंती, टेबल एवढेच काय खुर्चीसह मिळेल त्या ठिकाणी अश्लिल मजकूर लिहिला. आरोग्य विभागाच्या स्लोगनवरूनही असा मजकूर तयार केला. यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना हा प्रकार कर्मचाऱ्यांवरील रागातून, खोडसाळपणाने की आणखी कोणत्या कारणातून करण्यात आला, हे कळायला मार्ग नाही. मात्र हा प्रकार लक्षात आल्यानंतर गावातील प्रतिष्ठितांनाही बोलावले होते. याशिवाय कळमनुरी पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर पोलिसांनीही येथे पाहणी केली. घटनेच्या ठिकाणी चित्रीकरण केले याबाबत लवकरच आरोपीचा छडा लावला, जाईल असेही सांगण्यात आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrimeगुन्हा