शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बैद्यनाथ कंपनीच्या संचालकांची फसवणूक : ४० लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:27 IST

मध्यभारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि बैद्यनाथ कंपनीचे संचालक प्रणव सुरेशकुमार शर्मा (रा. बैद्यनाथ हाऊस, चिडणीस मार्ग, सिव्हील लाईन) यांची त्यांच्याच संपर्कातील व्यक्तींनी तब्बल ४० लाखांनी फसवणूक केली.

ठळक मुद्देविमा पॉलिसीची रक्कम हडपली : दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यभारतातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि बैद्यनाथ कंपनीचे संचालक प्रणव सुरेशकुमार शर्मा (रा. बैद्यनाथ हाऊस, चिडणीस मार्ग, सिव्हील लाईन) यांची त्यांच्याच संपर्कातील व्यक्तींनी तब्बल ४० लाखांनी फसवणूक केली. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या बनवेगिरीचा भंडाफोड झाल्यानंतर शर्मा यांनी सोमवारी गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी एका दाम्पत्यासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिबब्रत सरत कानुगो, रिना सिबब्रत कानुगो (रा. विष्णूभवन टॉवर, आकाशवाणी चौक), प्रवीण मित्तल (रा. करिम लेआऊट, गोपाळनगर), विनय पुरुषोत्तम शर्मा आणि प्रियेशकुमार मिश्रा (रा. अपूर्वा टॉवर, सदर, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.प्रणव शर्मा यांनी त्यांची व परिवारातील सदस्यांची बजाज अलायन्स लाईफ इंशोरन्स कंपनीची पॉलीसी काढली होती. ती अनावश्यक असल्यामुळे शर्मा यांनी त्यात गुंतविलेली रक्कम परत मिळावी म्हणून सिबब्रत कानुगोशी चर्चा केली. कानगोने त्यांना प्रारंभी पॉलिसीची रक्कम काढून देतो, अशी थाप मारली. नंतर पॉलीस सरेंडर करून बंद करण्यासाठी जास्त रक्कम लागेल, असे सांगितले. त्यानंतर २७ डिसेंबर २०११ पासून तो आजवर शर्मा यांच्या ग्रेट नाग रोड, बैद्यनाथ आयुर्वेदीक भवन प्रा.लि. च्या कार्यालयातून पॉलीसीचे चेक नेले. मात्र ती रक्कम (३९ लाख, ४८ हजार, ५०७ रुपयांचे डीडी) आरोपी प्रवीण मित्तल, विनय पुरुषोत्तम शर्मा, प्रियेशकुमार मिश्रा आणि रिना सिबब्रत कानुगो (रा. विष्णूभवन टॉवर, आकाशवाणी चौक) यांच्या खात्यात जमा केली. ही बनवेगिरी उघडकीस आल्यानंतर प्रणव शर्मा यांना त्यांची ३९ लाख, ४८ हजार, ५०७ रुपयांनी फसवणूक झाल्याचे आणि या फसवणूकीत कानुगोसोबतच उपरोक्त सर्व आरोपी सहभागी असल्याचेही लक्षात आले. त्यामुळे शर्मा यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ४२०, ४२० (ब), ४०६ आणि ४०९ अन्वये सोमवारी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी