शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थेट पोलीस आयुक्तांकडून लकडावाला बंधूची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 19:25 IST

गँगस्टर-पोलीस लागेबांधे प्रकरण, दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

ठळक मुद्देनदीम सत्तार व सलीम महाराज यांच्या पोलीस कोठडीची मुदत अनुक्रमे १३ व ९ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. नदीम हा शनिवारी दुबईहून परतल्यानंतर गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी विमानतळावर अटक केली.

मुंबई - खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या गँगस्टर एजाज लकडावाला व त्याचा आतेभाऊ नदीम अब्दुल सत्तार यांच्याकडे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी कसून चौकशी केली. या टोळीची काही पोलीस अधिकारी व अंमलदाराशी लागेबांधे असल्याची चर्चा आहे. त्यानुषंगाने आयुक्तांनी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, नदीम सत्तार व सलीम महाराज यांच्या पोलीस कोठडीची मुदत अनुक्रमे १३ व ९ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. नदीम हा शनिवारी दुबईहून परतल्यानंतर गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी विमानतळावर अटक केली.

बांधकाम व्यावसायिक, व्यापाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देवून खंडणीसाठी धमकाविल्याप्रकरणी गँगस्टर एजाज लकडावाला त्याचे हस्तक परवीन तारीक, सलीम महाराज यांच्यावर आतापर्यंत शहर व उपनगरातील विविध ठिकाणचे एकुण ३० गुन्हे दाखल आहेत.त्यांच्यावर ‘मोक्का’तर्गंत कारवाई करण्यात आली असून फरारी असलेल्या नदीम अत्तारलाही शनिवारी अटक केली आहे. तिघांकडे केलेल्या चौकशीतून त्यांचे मुंबईतील काही पोलीस अधिकारी व अंमलदाराशी निकटचे संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. बिल्डर, व्यापाऱ्यांना धमकावून रक्कम उकळण्यात त्यांचे सहकार्य मिळाले असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यामुळे गँगस्टर-पोलिसांचे लागेबांधे असल्याचे उघड झाले असून याप्रकरणी तपास अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आयुक्त पदाचा शनिवारी पदभार घेतलेल्या परमबीर सिंग यांनी या प्रकरणाची समूळ चौकशी केली जाणार असून कोणा पोलिसांचा त्यांच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यास यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुषंगाने शनिवारी लकडावाला बंधू व महाराज यांना त्यांच्यासमोर उभे करण्यात आले. सुमारे अर्धा तास त्यांनी तिघांकडे कसून चौकशी केली आहे. त्यांनी आतापर्यंत केलेले गुन्हे, त्यांचे अन्य साथीदार आदीबाबत सविस्तर विचारणा केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

दरम्यान, या गुन्ह्याप्रकरणी प्रकरणी परवीन तारीक न्यायालयीन कोठडीत तर अन्य तिघे पोलीस कोठडीत आहेत. नदीम अत्तार व महाराज यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी नदीमला १३ तर महाराजला ९ मार्चपर्यंत कोठडीत मुदतवाढ मिळाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :ExtortionखंडणीPoliceपोलिसcommissionerआयुक्तMumbaiमुंबई