शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

थेट दिल्लीतील बँकेत साधला संपर्क; ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी मिळवून दिले सव्वापाच लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 21:56 IST

Crime News : चितळसर पोलिसांनी ती संपूर्ण रक्कम अवघ्या 48 तासांमध्ये परत मिळवून दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देया बँक अधिकार्यांनी फिर्यादी यांच्या लोकपुरम येथील शाखेमध्ये पाच लाख 25  हजारांची रक्कम वळती केल्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाने समाधान व्यक्त केले.त्यांच्या बँक खात्यातून पाच लाख 30 हजारांची रोकड वळती केली. हा लहान मुलगा शिक्षणासाठी आयर्लंड येथे वास्तव्याला आहे. आयरीश सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून 21 सप्टेंबर 2021 रोजी तुमच्या मुलाने बेकायदेशीरपणो अमेरिकन वेबसाईट बघितली आहे.

ठाणे : एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाईन फसवणुकीने पाच लाख 30 हजार 140   रुपयांची रक्कम लुबाडण्यात आली होती. या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून चितळसर पोलिसांनी ती संपूर्ण रक्कम अवघ्या 48 तासांमध्ये परत मिळवून दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी बुधवारी दिली.

आयसीआयसीआय बँकेच्या लोकपुरम शाखेत या नागरिकाचे आण त्यांच्या मुलाचे संयुक्त बचत खाते आहे. त्यांचा हा लहान मुलगा शिक्षणासाठी आयर्लंड येथे वास्तव्याला आहे. आयरीश सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून 21 सप्टेंबर 2021 रोजी तुमच्या मुलाने बेकायदेशीरपणो अमेरिकन वेबसाईट बघितली आहे. वेबसाईटकडे तुझा मोबाइल नंबर आणि अकाउंट डिटेल आहेत, ते तुङो अकाउंट हॅक करून पैसे काढून घेऊ शकतात. असे कारण सांगून अज्ञात आरोपीने त्यांच्या मुलाला फोनद्वारे बतावणी केली. त्या मुलाने फोनवरील व्यक्ती सांगेल त्याप्रमाणो कृती केली. यातून त्यांच्या बँक खात्यातून पाच लाख 30 हजारांची रोकड वळती केली. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात 24 सप्टेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस उपायुक्त डॉ. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड, सहायक पोलीस निरीक्षक पी. जे. सुरवाडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जलदगतीने तपास केला. त्यांनी या बँक खात्याची माहिती मिळवून आरोपीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, रोहिणी, नवी दिल्ली येथील खात्यात फिर्यादी यांची फसवणूक झालेली रक्कम आढळली. हे खाते गोठविण्यासाठी बँकेच्या अधिका-यांशी संपर्क साधून मेलद्वरे पत्नव्यवहार केला. या बँक अधिकार्यांनी फिर्यादी यांच्या लोकपुरम येथील शाखेमध्ये पाच लाख 25  हजारांची रक्कम वळती केल्यामुळे या ज्येष्ठ नागरिकाने समाधान व्यक्त केले.

टॅग्स :fraudधोकेबाजीthaneठाणेbankबँकArrestअटकPoliceपोलिस