शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

बीड: डिजिटल अरेस्ट! निवृत्त शिक्षिकेचे ८३ लाख गेले; मनी लाॅन्ड्रिंग, अतिरेकी फंडिंग केल्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:52 IST

पैसे पाठविल्यानंतर सायबर भामट्यांकडून नंबर ब्लॉक

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: मी महाराष्ट्र पोलिस बोलत असून, तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेक्यांना फंडिंग झाल्याची माहिती आहे, असे म्हणत व्हाॅट्सॲपला व्हिडीओ कॉल करून निवृत्त शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट केली. त्यानंतर २१ ते २९ मे यादरम्यान तब्बल ८३ लाख रुपये ऑनलाइन हडप केले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पूजा (नाव बदलले, वय ६५, रा. अंबाजोगाई, जि. बीड) या निवृत्त शिक्षिका आहेत. २० मे रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. मी महाराष्ट्र पोलिस संजय पिसे बोलतो, असे त्याने सांगितले. नंतर हिंदी भाषेत तो म्हणाला, की तुमच्या आधार कार्डवरून दुसरे सीमकार्ड १६ एप्रिल रोजी घेतले आणि तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रिंग व अतिरेक्यांना फंडिंग झाली आहे. तुम्ही तीन दिवसांत सर्व सहकार्य करा आणि आम्ही तुम्हाला यातून सोडवू. यासाठी आम्ही विश्वास नांगरे पाटील साहेब यांना स्पेशली विनंती केल्याचा विश्वास दिला. त्यानंतर मराठीतून बोलत व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल करून डिजिटल अरेस्ट करण्यात आले. खरे वाटावे म्हणून मुंबई पोलिसचे ऑफीस, झेंडे, लोगो पाठीमागे लावला. हे खरे असे समजून पूजा यांनी २१ मे रोजी पहिल्यांदा ३५ लाख १० हजार रुपये ऑनलाइन पाठविले.

पैसे पाठविल्यानंतर सायबर भामट्यांकडून नंबर ब्लॉक

पुढे त्यांनी २९ मेपर्यंत तब्बल ८३ लाख १ हजार ८१६ रुपये सायबर भामट्यांना पाठविले. त्यानंतर त्यांनी पूजा यांचा नंबर ब्लॉक केला. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि सायबर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली. त्यावरून शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.

प्लॉट गहाण ठेवून सावकाराकडून घेतले कर्ज

सायबर भामट्यांनी पूजा यांना भीती दाखवत तुमच्याकडे कोणती संपत्ती आहे, हे आम्हाला येथे दिसते. तुम्ही लपवून ठेवू नका, असे सांगितले. त्यानंतर पूजा यांनी प्लॉट गहाण ठेवून त्यावर खासगी सावकाराकडून १५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. २९ मे रोजी हे सर्व पैसे भामट्यांना ऑनलाइन पाठविले.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीdigitalडिजिटलArrestअटक