शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली 'डिजिटल अरेस्ट'; कोल्हापुरातील उद्योजकाला ८१ लाखांचा गंडा

By उद्धव गोडसे | Updated: September 15, 2024 10:13 IST

दहशतवादी समुहाला आर्थिक मदत केल्याची भीती घालत अज्ञातांनी ही लुबाडणूक केली. हा प्रकार ६ ते ११ सप्टेंबर दरम्यान घडला.

कोल्हापूर : ऑनलाईन फसवणुकीचे रोज नवे प्रकार समोर येत असताना आता एनआयएचे (राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा) अधिकारी असल्याचे सांगत ऑनलाईन अटक करून उद्योजकाची ८१ लाखांची लूट केली. दहशतवादी समुहाला आर्थिक मदत केल्याची भीती घालत अज्ञातांनी ही लुबाडणूक केली. हा प्रकार ६ ते ११ सप्टेंबर दरम्यान घडला. याबाबत उद्योजकाने शुक्रवारी (दि. १३) राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फसवणूक झालेले उद्योजक गोशिमाचे माजी अध्यक्ष आहेत.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील उद्योजकास ६ सप्टेंबरला व्हॉट्सॲप कॉल आला. एनआयएचे अधिकारी असल्याचे सांगत त्याने न्यायालयाच्या आदेशानुसार एका गंभीर गुन्ह्यात तुम्हाला ऑनलाईन अटक केल्याचे सांगितले. 'हैदराबाद येथील एका व्यक्तीने दहशतवादी समुहाला १२२ कोटी रुपयांची मदत केली आहे. या पैशांमधून दहशतवाद्यांनी शस्त्रे खरेदी केली आहेत. या व्यवहारात तुमच्या बँक खात्यात २० ते २२ कोटी रुपये वर्ग झाले आहेत. 

हा देशविरोधी गंभीर गुन्हा असल्याने एनआयएचे अधिकारी तुमच्या अवतीभवती वावरत आहेत. तुमच्यावर करडी नजर असून, कोणत्याही क्षणी ते तुम्हाला संपवू शकतात. तुमच्या जिवाला धोका असल्याने जवळच्या एका हॉटेलमध्ये जाऊन आमच्या ऑनलाईन अटकेत राहा,' असे सांगून त्याने उद्योजकास भीती घातली. जबरदस्तीने शिवाजी पार्क येथील एका हॉटेलमध्ये राहण्यास भाग पाडले. त्यानंतर यातून सुटका करून घेण्यासाठी बँक खात्यावर ८१ लाख रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग करून घेतले.

भीतीपोटी उद्योजकाने त्यांच्या बँक खात्यातील ८१ लाख रुपये संशयिताच्या बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर संशयितांचे फोन यायचे थांबल्याने त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजारामपुरी पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध सुरू केला आहे.

थेट जीवे मारण्याची भीतीसंबंधित उद्योजकाने हैदराबाद येथील व्यक्तीशी कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही. मात्र, थेट जिवे मारण्याची भीती घातल्याने ते संशयिताच्या सूचनांचे पालन करीत गेले. याच भीतीतून त्यांनी हॉटेलमध्ये स्वत:ला डांबून घेतले. आधार कार्ड, पॅन नंबर यासह इतरही महत्त्वाची माहिती संशयितांकडे असल्याने ते अधिकच घाबरले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमkolhapurकोल्हापूर