शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डीआयजी मोरे प्रकरण : बेपत्ता मुलगी सापडली 20 वर्षीय मुलासोबत 

By पूनम अपराज | Updated: January 14, 2020 20:16 IST

गेल्या अनेक दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. 

ठळक मुद्देदेहराडूनमधून या पीडित मुलीला पोलिसांनी मुंबईत आणलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी बेपत्ता मुलगी सापडली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

पूनम अपराज / वैभव गायकर 

नवी मुंबई - डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केलेली अल्पवयीन बेपत्ता मुलगी अखेर सापडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देहराडूनमधून या पीडित मुलीला पोलिसांनी मुंबईत आणलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एका 20 वर्षीय मित्रासोबत मुलीला मुंबईत आणल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीडित अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईवरून तब्बल १७०० किमी दूर या तरुणीचा शोध लागला आहे. ६ जानेवारीला पीडित मुलगी घरातून रात्री साडे अकरा वाजता बेपत्ता झाली होती. पीडित मुलगी मुंबईस्थित लोकमान्य  टिळक टर्मिनसहून उत्तरप्रदेशला गेली होती. लोकमान्य टिळक टर्मिनसवरील सीसीटीव्हीमध्ये तरुणी कैद झाली होती.तेव्हापासून पोलिसांनी या तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशात देखील नवी मुंबई पोलिसांची दोन पथकं तरुणीचा शोध घेत होत्या. अखेर तरुणी पोलिसांच्या हाती लागली आहे. कौटुंबिक मित्र देखील यावेळी तरुणीच्या सोबत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र अद्याप मुलीबाबत आम्हाला काही माहित नसल्याचे सांगितले. नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी बेपत्ता मुलगी सापडली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नवी मुंबई पोलीस तिला घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, बेपत्ता तरुणी कुठे सापडली याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली जाईल असे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी स्पष्ट केले.

डीआयजी मोरे प्रकरणातील तरुणी बेपत्ता; पोलिसांकडून शोधाशोध सुरु  

आता या प्रकरणाला अजून वेगळं वळणं लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वाहन चालक असलेल्या साळवेकडून गायब असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टात धमकवण्यात आल्याचा दावा तिच्या पालकांनी केला होती. पालकांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर निशिकांत मोरे यांच्या निलंबनानंतर वाहन चालकावर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 

गृह विभागाचा मोठा निर्णय; विनयभंगाचा आरोप असणारे डीआयजीचे निलंबन

पनवेल सत्र न्यायालयाने मोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी डीआयजी मोरेंचे प्रयत्न सुरु आहेत. डीआयजी मोरे अद्याप फरार आहेत.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंsuspensionनिलंबनPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबईUttar Pradeshउत्तर प्रदेश