शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

...और उसका "ईलाज" करवा रही हो; सुशांतच्या वडिलांनाही होती त्याच्या आजाराची माहिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 12:39 IST

ज्यात त्यांनी 'फ्रेंड बनकर उसकी देखभाल कर रही हो, उसका "इलाज" करवा रही हो' असा उल्लेख केला असून मग नेमक्या कोणत्या उपचाराबाबत ते  विचारणा करत आहेत? असा प्रश्न निर्माण विचारला जात आहे. 

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: सुशांतसिंग राजपूत (३४) याची बहीण मीतू सिंग हिच्यासह त्याचे वडील तसेच या प्रकरणातील मुख्य तक्रारदार के के सिंग यांनाही मुलाच्या आजारपणाची पूर्ण कल्पना होती, अशी शंका एका चॅटमुळे व्यक्त होत आहे. रिया चक्रवर्ती हिला त्यांनी २९ नोव्हेंबर, २०१९ रोजी तो पाठवला होता, ज्यात त्यांनी 'फ्रेंड बनकर उसकी देखभाल कर रही हो, उसका "इलाज" करवा रही हो' असा उल्लेख केला असून मग नेमक्या कोणत्या उपचाराबाबत ते  विचारणा करत आहेत?, असा प्रश्न विचारला जात आहे. 

सुशांतच्या आजारपणाबद्दल माहिती नसल्याचे अद्याप त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत होते. मात्र त्याची मॅनेजर श्रुती मोदी आणि मीतू यांच्यात झालेले चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'इंडिया टुडे' ने याचे वृत्त दिले होते. त्या वृत्तानुसार २६ नोव्हेंबर,२०१९ रोजी मीतू स्वतः मोदीला सुशांतच्या priscribition बद्दल आणि डॉक्टरबाबत माहिती विचारताना दिसत आहे. त्यामुळे मीतूला सुशांतच्या आजारपणाबाबत माहित होते हे उघड झाले आहे. त्यानंतर याच महिन्यात तीन दिवसानंतर म्हणजे २९ नोव्हेंबर, २०१९ रोजी के के सिंग यांनी रियाला केलेला व्हॉट्सअँप मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ज्यात 'जब तुम जान गयी की मे सुशांत का पापा हु तो बात क्यो नही की. आखीर बात क्या है.फ्रेंड बनकर उसका देखभाल और उसका इलाज करबा रही हो तो मेरा भी फर्ज बनता है की सुशांत के बारे मे सारी जानकारी मुझे भी रहे.इसलीये कॉल कर मुझे भी सारी जानकारी दो' अशा आशयाचा हा मेसेज आहे. यात  'उसका इलाज करवा रही हो' असे त्यांनी म्हटल्याने ते सुशांतच्या नेमक्या कोणत्या उपचाराबाबत रियाकडून जाणून घेऊ इच्छित होते आणि फोन करून मला माहिती दे असे सांगत आहेत? याबाबत संशय व्यक्त होत आहेत. मेसेजला रियाने रिप्लाय दिला नसल्याचे देखील त्यांनी प्रसारमाध्यमाना सांगितले होते. याचाच अर्थ मीतूसह सिंग यांनाही त्याच्या आजारपणाबाबत पूर्ण कल्पना होती असे म्हटले जात आहे. मीतूची चौकशी सीबीआय करणार आहेच, मात्र आता सिंग यांच्याकडेही याबाबत विचारणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत